7th Pay Commission: शिंदे सरकारने (State Government) नुकताच राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांच्या (State Government Employee) डीए (Dearness Allowance) मध्ये तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सदरची वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाणार आहे. यामुळे वाढलेला डीए (DA) फरकासह कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव ऑगस्ट महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना पेन्शन सोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्य शासनातील कर्मचाऱ्यांची चांदी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशा परिस्थितीत आज आम्ही राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण डीए वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे तसेच जानेवारी महिन्यापासून सदरची वाढ करण्यात आली असल्याने कर्मचाऱ्यांना एकूण किती डीए थकबाकी मिळणार आहे हे कसं काढायचं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना एकूण 34 टक्के डीए मिळणार आहे. यामुळे तीन टक्के डीए वाढल्यास पगारात किती वाढ होणार हे खालील प्रमाणे जाणून घ्या.

  • तीन टक्के डीए वाढला असल्याने नेमका पगार किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ वेतनाला 3 ने मल्टिप्लाय करावे लागणार आहे आणि याला 100 ने डिव्हाइड करावे लागणार आहे. याचे जे उत्तर येईल ते तीन टक्के डीए असेल, म्हणजेच एवढी पगारवाढ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
  • सोप्या पद्धतीने समजून घ्या:-

मित्रांनो समजा मुळ वेतन 50,000/- असेल तर :- 50000 X  3 / 100 = 1500 /- म्हणजे इतकी रक्कम आपल्या पगारात वाढणार आहे.

  • आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीए थकबाकी कशी काढायची. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने जानेवारी महिन्यापासून डिए वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत डीए थकबाकी देखील आता कर्मचाऱ्यांना शासनाकडून अदा केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकी थकबाकी कशी काढायची. मित्रांनो जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत म्हणजे सात महिन्याच्या कालावधीमधील डी.ए थकबाकीची रक्कम काढण्यासाठी मुळ वेतन X 3 /100 = ( एका महिन्याची थकबाकी ) X 7
  • सोप्या भाषेत समजून घ्या:-

समजा 50000/- मुळ वेतन आहे,  तर 50000 X 3 /100 =1500 X 7 = 10500/- सात महिन्याची डी.ए थकबाकी