7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू केली जावी या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी (Government Employee) वारंवार मायबाप सरकारकडे (State Government) मागणी केली आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील सर्वच कर्मचार्‍यांना (State Government Employee) जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मायबाप शासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र या संस्थेने राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.

21 ऑगस्ट रोजी या संस्थेच्या एका सभेत राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत चर्चा झाली. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राज्यात राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा रंगली आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊक कसा आहे 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली आहे.

मात्र नवीन पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्याचे राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. यामुळे राज्य शासनाकडून 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत एका अभ्यास समितीचे देखील स्थापना करण्यात आली आहे. अभ्यास समितीची स्थापना 2019 मध्येच झाली आहे. मात्र असे असले तरी या अभ्यास समितीने अजूनही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचे राज्य कर्मचार्‍यांचे मत आहे.

सदर अभ्यास समितीने आतापर्यंत तीन ते चार बैठका घेतले असून अजूनही सकारात्मक निर्णय निघत नसल्याने राज्य कर्मचारी आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सेनादलाला जुनी पेन्शन योजनाच कायम ठेवण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर खासदार, आमदार यांना देखील जुनीच पेन्शन योजना कायम आहे.

मात्र 2005 नंतर रुजू झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1982 ची परिभाषित पेन्शन योजना लागू नाही. अशा परिस्थितीत 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांकडुन वारंवार मागणी करण्यात येत आहे.

मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे शासनाकडून गांभीर्याने विचार केला जात नसल्याने, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र या संघटनेमार्फत दि.21 सप्टेंबर 2022 रोजी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. याबाबत संघटनेने एक अधिकृत्त पत्र जारी करून सदर बाईक रॅली आयोजनाबाबत अवगत केले आहे.