7th Pay Commission: राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता, राज्य शासनातील कर्मचारी (Government Employee) नवीन पेन्शन योजनेचा (NPS) गेल्या अनेक दिवसांपासून परखड विरोध करत आहेत.

आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने (Maharashtra State Old Pension Association) 2005 नंतर शासन (Government) सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य (Maharashtra) जुनी पेन्शन संघटनेकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीचा काही परिणाम होतो की नाही याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने जारी केलेले महत्वाचे परिपत्रक आज आपण देखील जाणून घेऊया.

12 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात काय दडलंय 

आपणास कळविण्यात येते कि, संघटनेची महत्वपूर्ण राज्य बैठक दि.21 ऑगस्ट 2022 रोज रविवारला दुपारी 12.00 वाजता कर्जत, रायगड येथे आयोजित केली आहे. करिता संघटनेचे सर्व विश्वस्थ, सर्व राज्यपदाधिकारी तथा जिल्हाध्यक्ष यांनी सदर सभेला न चुकता उपस्थित राहून सहकार्य करावे हि विनंती.

सभेचे विषय :

1) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.

2) संघटनेचे पुढील दिशा व धोरण यावर चर्चा करणे.

3) संघटनेच्या राज्य अधिवेशनावर चर्चा करणे.

4) सभासद नोंदणी अभियान यावर चर्चा करणे.

5) जिल्हा आढावा घेणे.

6) अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर आलेल्या विषयवार चर्चा करणे.

निश्चितच राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागून आहे. दरम्यान आपल्या राज्यातील अनेक राज्य शासनातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेला लागू करण्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करीत आहेत. एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी केली आहे. मात्र, यावर शासनाने अद्याप तरी प्रकाशझोत टाकलेला नाही. यामुळे या बैठकीतून यावर काय सारं निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.