7th Pay Commission : राज्य शासनाच्या (State Government) तमाम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 17 ऑगस्ट रोजी शासनाने (Maharashtra Government) एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) पारित केला होता.

शासन निर्णयाअन्वये महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेनतधारक कर्मचाऱ्‍यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतन तसेच निवृत्ती वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता (DA) व महागाई भत्ता फरक रोखीने अदा केला जाणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून निर्णय जारी करण्यात आला होता. यामुळे ऑगस्ट महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबर मध्ये मिळणाऱ्या पेमेंट सोबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भलीमोठी रक्कम मिळणार आहे.

राज्य शासनातील कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्यातील म्हणजे सप्टेंबर मध्ये मिळणाऱ्या पेमेंटमध्ये तीन टक्के महागाई भत्ता वाढणार आहे शिवाय जानेवारी महिन्यापासून थकित महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील या पेमेंट सोबत कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणार आहे. मात्र असे असतानाच एक अडचण यामध्ये निर्माण झाली आहे.

मित्रांनो जस की आपण बघितलंच दोन-तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला असून या निर्णया अन्वय आता राज्यातील कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या प्रसंगी पैशांची चणचण भासू नये म्हणून सप्टेंबर महिन्यात मिळणारे ऑगस्ट महिन्याचे पेमेंट हे ऑगस्ट महिन्यातच कर्मचाऱ्यांना देऊ केले जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन बिल 29 ऑगस्ट पूर्वीच कोषागार कार्यालयाकडून मंजूर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मात्र असे असले तरी अनेक कर्मचाऱ्यांचे अजून थकबाकीचे स्टेटमेंट पूर्णपणे तयार झालेले नाहीत. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यापासून मिळणारी महागाई भत्ता थकबाकी आता राज्यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पेमेंट सोबत मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय, काही तांत्रिक अडचणी येत असल्याने आता थकित महागाई भत्ता फरकाची रक्कम सप्टेंबर महिन्याच्या वेतन सोबत कर्मचार्‍यांना दिली जावी असे आदेश पारित करण्यात आले आहेत.

याशिवाय शासनाने ज्या कर्मचाऱ्यांचे सर्व तपशील योग्य असतील तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट बनवले गेले असतील त्यांना या महिन्याच्या पेमेंट सोबतच वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जावी असे आदेश दिले आहेत. एकंदरीत तांत्रिक अडचणीमुळे वाढीव महागाई भत्ता थकबाकी पुढील महिन्याचा पेमेंट सोबत मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.