7th Pay Commission: महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) एक कामाची बातमी समोर येत आहे. शासनातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने (Government) एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

राज्य शासनाच्या पंधरा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या तसेच 50व्या अशा पर्यंत शासन सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी पंधरा वर्षे शासन सेवा किंवा वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत शासन सेवा पूर्ण केल्यानंतर काही सूट देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय (Government Resolution) शासनाद्वारे जारी करण्यात आला आहे. संबंधित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून (General Administration Department) 11 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

यामुळे ही एक राज्यातील तमाम शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असल्याचे सांगितले जात आहे. आज आपण 11 ऑगस्ट 2022 रोजी शासनाने राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेला महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. सामान्य प्रशासन विभागाकडून 11 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय जसाचा तसा खालील प्रमाणे:-

11 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय:- 

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ वगळण्यात येत असून या ऐवजी खालीलप्रमाणे परिच्छेद क्र. २ अंतर्भूत करण्यात येत आहे. पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळण्याकरीता शासन सेवेत कर्मचाऱ्याची १५ वर्षे सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक किंवा त्याच्या वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जे नंतर घडेल त्यानंतर लगतचा दिनांक हा कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी विहित केलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचा दिनांक समजण्यात येईल.”

२. सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०८१११४३७२३८५०७ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सदरचा शासन निर्णय जारी झाल्यामुळे राज्यातील अनुभवी कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी विभागीय परीक्षेची सूट देण्यात आली आहे. निश्चितचं यामुळे पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षा द्यावी लागणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.