7th Pay Commission : मित्रांनो राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांना (State Government Employee) जानेवारी दोन हजार बावीस पासून 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सदर लागू करण्यात आलेला महागाई भत्ता ऑगस्ट महीन्याच्या देयकासोबत रोखीने अदा करणे तसेच महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत अदा करण्यासाठी शासन निर्णय (Government Resolution) जारी करण्यात आला होता.

मात्र असे असले तरी राज्यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना (Government Employee) अजून देखील महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळालेली नाही. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील काही विभागातील कर्मचाऱ्यांना निधीअभावी महागाई भत्ता फरकाची रक्कम शासनाला (Maharashtra Government) वर्ग करता येणे अशक्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर वनामती संस्थेस शासनाकडून अनुदान देण्यात आले आहे.

यासाठी सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (Gr) जारी केला आहे. जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता वनामती संस्थेस एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सहायक अनुदाने या उद्दीष्टाखाली माहे जानेवारी 2022 पासुन महागाई भत्ता थकबाकी व ऑगस्ट 2022 तसेच सप्टेंबर 2022 च्या वेतनाकरीता 8,27,400/- रुपये इतके अनुदान अर्थसंकल्पीय अंदाज संनियंत्रण प्रणालीद्वारे संस्थेस दिले जात आहे. यासाठी शासन निर्णयात काही अटी देखील घालून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत जानेवारी ते जुलै या महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी मिळालेली नाही अशा कर्मचार्‍यांना सप्टेंबर महिन्याच्या देयकासोबत महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे. निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

मित्रांनो खरं पाहता, राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत दिली गेली आहे, मात्र अनेक विभागातील राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप महागाई भत्ता थकबाकी मिळालेली नाही. आता अशा कर्मचार्‍यांना सप्टेंबर महिन्याच्या पेमेंटसोबत महागाई भत्ता थकबाकी दिली जाणार आहे. यामुळे अशा कर्मचार्‍यांना नवरात्र उत्सवात हे एक मोठं गिफ्ट राहणार आहे.