7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्य शासनातील (State Government) शासन सेवेत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) देखील एक महत्त्वाची बातमी आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना काळात थकलेला 18 महिन्याचा महागाई भत्ता (DA) लवकरात लवकर कर्मचार्‍यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून त्यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे.

मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) लवकरात लवकर कोरोना काळातील 18 महिन्याचा थकीत महागाई भत्ता दिला जावा यासाठी वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात आहे. दरम्यान या 18 महिन्याचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना लवकर मिळावा यासाठी स्टाफ साईड संघटनेचे राष्ट्रीय परिषदेचे सरचिटणीस श्री.शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सेक्रेटरी यांना पत्र लिहीले आहे. यामुळे कॅबिनेट सेक्रेटरी यांना लिहलेल्या या पत्रात नेमक दडलंय काय हे आज आपण जाणून घेऊया.

शिव गोपाल मिश्रा यांनी लिहिलेल्या सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2020 ते 01 जुलै 2022 आणि जानेवारी 2021 पासुन थकीत डी.ए त्याचबरोबर दिलासा भत्ता लवकरात लवकर दिला जावा. तसेच या पत्राशिवाय या थकित महागाई भत्ताबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारसोबत विस्तृप्त चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे थकित पडलेला महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता लवकरच मिळणार असल्याचे चिन्ह दिसताहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर 18 महिने कालावधीचा थकलेला महागाई भत्ता मिळणार असल्याच्या चर्चा सुरु असताना स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदचे सचिव तसेच सदस्य 18 महिने कालावधीमधील थकीत रक्कम अदा करणेसंदर्भात चर्चा करण्यासाठी तयार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शिव गोपाल मिश्रा यांनी लिहिलेल्या सदर पत्रात थकित महागाई भत्त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर अठरा महिने कालावधीचा थकलेला महागाई भत्ता मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना या थकलेला महागाई भत्ताचा लाभ मिळाला तर राज्य शासनाच्या सेवेतील राज्यशासन कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. यामुळे केंद्रीय तसेच राज्य कर्मचाऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्याचे चित्र आहे.