7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने (State Government) एक मोठा आणि अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे राज्य कर्मचाऱ्यांना (State Government Employee) दिवाळी तसेच ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर अग्रीम रक्कम तसेच बोनस (Bonus) जाहीर केला जातो. राज्य शासनाकडून (Maharashtra Government) दिली जाणारी ही रक्कम बिनव्याजी असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना (Government Employee) सणाच्या दिवसात एक मोठा आर्थिक दिलासा मिळत असतो.

कर्मचार्‍यांना दिली जाणारी ही अग्रीम रक्कम कर्मचाऱ्यांकडून एकूण दहा हप्त्यात वसूल केली जाते. शिवाय या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांसाठी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाची पर्वणी म्हणून सण अग्रीम रक्कम याकडे पाहिले जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या राज्यातील राज्य शासन सेवेत रुजू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये एवढी सण अग्रीम रक्कम जारी केली जात आहे.

मात्र आता यामध्ये वाढ झाली आहे. राज्यातील महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना, महापालिकेच्या शिक्षकांना, तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी तसेच ईद सणानिमित्त 22 हजार 500 रुपये एवढा बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असून त्यांची दिवाळी निश्चितच गोड होणार आहे. याशिवाय आरोग्य सेविकांना देखील त्यांचा एक पगार बोनस म्हणून यावेळी जाहीर झाला आहे.

या बोनस संदर्भातील अधिकृत घोषणा नवोदित शिंदे सरकार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः केली आहे. याशिवाय महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना देखील बोनस जाहीर झाला आहे याशिवाय अनुदानित शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना देखील दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करताना नवोदित मुख्य मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्मचाऱ्यांना आनंदात दिवाळी साजरा करा असं विधान केल आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवसात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त वाढीव बोनस जाहीर झाला आहे. कोणत्याही निमित्ताने वाढीव बोनस जाहीर झाला असला तरी देखील बोनस मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.