7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) वाढीबाबत आताची सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employee) तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात मोठी भरमसाठ वाढ होणार आहे.

मित्रांनो जस की आपणांस ठाऊक आहे की सध्या 34 टक्के दराने कर्मचाऱ्यांना (Employee) महागाई भत्ता मिळत आहे मात्र आता यामध्ये तब्बल पाच टक्के महागाई भत्ता (Dearness Allowances) वाढ होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सदरची महागाई भत्ता वाढ ही जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याने कर्मचार्‍यांना महागाई भत्ता थकबाकीचा देखील मोठा आर्थिक फायदा मिळणार असल्याचे जाणकार लोक नमूद करत आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की, ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI ) नवीनतम सुधारित आकडे 31 ऑगस्ट रोजी सार्वजनिक करण्यात आले आहेत. जस की आपणास ठाऊकच आहे की, कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरविण्यात येतो. यामुळे नवीनतम ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार आता कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता नव्याने ठरवला जाणार आहे.

मित्रांनो ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये देखील मोठी वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हाती आलेल्या एका माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 5% वाढ ही झाली पाहिजे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2022 या महिन्यापासून 4 टक्के डी.ए वाढ रोखीने अदा करणेबाबत जाहीर केले होते. म्हणजे जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चार टक्क्याने वाढ केली होती.

मात्र आता AICPI चे नवीन आकडेवारी समोर आली असल्याने डिए मध्ये चार टक्‍क्‍यांऐवजी पाच टक्के वाढ केली जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मित्रांनो AICPI चे आकडे जे की 31 ऑगस्ट रोजी सार्वजनिक करण्यात आले आहेत त्या आकडेवारीमध्ये जुलै 2022 पर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये जुन मध्ये AICPI चे निर्देशांकांचा आकडा 129.2 आहे. तसेच एआयसीपीआयच्या नवीन आकडेवारीत जुलै मध्ये निर्देशांकाचा आकडा 129.9 एवढा आहे. आता समोर आलेल्या या नवीन आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांसाठी 4.75 टक्के दराने वाढला पाहिजे होता. म्हणजे कर्मचाऱ्यांना जवळपास पाच टक्के दराने महागाई भत्ता वाढ होणे अपेक्षित आहे. सदरचा लाभ सप्टेंबर महिन्यापासून दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुळे कर्मचाऱ्यांना आता 39 टक्के दराने महागाई भत्ता येणार असल्याचे सांगितले जात आहे.