7th Pay Commission: 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने (Maharashtra State Government) राज्य शासन सेवेत रुजू असलेल्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्य शासनातील शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचा (DA) लाभ देण्यात आला आहे.

यामुळे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना (State Government Employee) मोठा दिलासा मिळाला आहे. आता मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.

खरे पाहता मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात (TA) वाढ करण्याबाबत प्रस्ताव प्रलंबित होता. आता, या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाला असून मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्यात वाढ मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

राज्य शासनाने नुकताच कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्यात मोठी वाढ केली आहे. आता मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वाहतूक भत्त्यात वाढ मिळणार आहे. मित्रांनो प्रवास भत्ता कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनश्रेणी अनुसार मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात असमानता बघायला मिळणार आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचार्‍यांचे पे लेवल 01 ते 06 मध्ये आहे अशा महानगर पालिका कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता 1000 रुपये लागु करण्यात येणार आहे. लेवल 07 ते 19 मध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2700 रुपये वाहतुक भत्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, पे लेवल 20 व त्यावरील लेवल मध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5400 रुपये वाहतुक भत्ता मिळणार असल्याचे समजत आहे. निश्चितचं मुंबई महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळाला आहे.

यामुळे मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणावं लागेल. जाणकार लोकांच्या मते मुंबई महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सहाजिकच मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठी वाढ होणार आहे.