7th Pay Commission: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक महत्त्वाचे आणि अतिशय दिलासादायक बातमी आता समोर येत आहे. राज्यातील (Maharashtra State Employees) ज्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकातील दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा कर्मचाऱ्यांसाठी एक गोड बातमी आता समोर आली आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे राज्यातील जवळपास सर्व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना (Employee) सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता मिळालेला आहे. तसेच अनेक राज्य प्रशासनातील कर्मचाऱ्यांना (Government Employees) सातवा वेतन आयोग फरकाचा दुसरा हप्ता देखील देऊ करण्यात आला आहे.

यामध्ये शासकीय जिल्हा परिषदा व इतर पात्र तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वर नमूद केलेल्या शासनाच्या अनेक कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता जुन 2021 मध्ये जारी करण्यात आलेला आहे. मात्र असे असले तरी अनेक कर्मचाऱ्यांना अजून दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत असे राज्य शासनातील कर्मचारी दुसरा हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

त्यासाठी वारंवार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून निवेदने देखील दिले जात आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, सातवा वेतन आयोग फरकातील दुसरा हप्ता अपुऱ्या निधीमुळे संबंधित राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करण्यास विलंब होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर तसेच नगरपरिषदा, महानगरपालिका मधील पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांना निधीअभावी दुसरा हप्ता मिळालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

या व्यतिरिक्त ज्या कर्मचाऱ्यांकडे पॅन क्रमांक उपलब्ध नव्हते अशा कर्मचार्‍यांना देखील सातवा वेतन आयोग फरकाचा हप्ता देण्यात आलेला नाही. या अनुषंगाने राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुसरा आणि तिसरा हप्ता लवकरात लवकर मिळावा यासाठी 2500 कोटीची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे.

संबंधित मागणी पेन्शन संघटनेच्या शिक्षण संचालक तसेच अधिक्षक प्राथमिक संचालक यांच्या वतीने नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नानाविध अडचणींचा देखील या ठिकाणी निकाल लावला जावा या संदर्भात देखील निवेदन देण्यात आले आहे. निश्चितच ज्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा हप्ता मिळालेला नाही त्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोगाचे फरकातील हफ्ते देण्यात येणार आहेत.