7th Pay Commission : राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता 2005 नंतर शासन सेवेत (State Government) रुजू झालेल्या राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना (Government Employees) जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू न करता नवीन पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत राज्य शासनातील कर्मचारी मायबाप सरकारकडे (Maharashtra Government) वारंवार जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत मागणी करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, 2005 पूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत पालिका प्रशासन दिरंगाई करत असल्याचे चित्र होते.

यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत काम करणारे कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत वारंवार पालिका प्रशासनाकडे तसेच मायबाप सरकारकडे मागणी करत होते. सदर मागणीचा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गांभीर्याने विचार केला असून महापालिका प्रशासन यांच्या समन्वयाने सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे.

त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मध्यात आनंदाचे वातावरण असून सदर कर्मचार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महापालिका प्रशासनाचे आभार देखील यावेळी मानले असल्याचे सांगितले जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मध्ये 2005 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना 1982 लागू करण्यात आली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री व कल्याण डोंबिवली पालिकाच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी अजून एक गिफ्ट कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत 18 वर्षांपासुन कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले गेले आहे. यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन यांनी घेतलेल्या सदर निर्णयाचे पालिका कर्मचाऱ्यांकडुन स्वागत करण्यात आले आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ज्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत रुजू केले गेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी वाहक, कंत्राटी चालक,कंत्राटी शिपाई अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या महापालिका कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजु करुन घेणेबाबत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला असल्याने कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले गेले आहेत. मित्रांनो कल्याण-डोंबिवली महापालिका मध्ये अठरा वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 59 आहे. अशा परिस्थितीत या 59 कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी एक मोठे गिफ्ट दिलं असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.