MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचार्‍यांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या मदतीने कर्मचारी कोणतीही कागदपत्रे जमा केल्याशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. चिकित्सा अग’ीम दावा (मेडिकल अ‍ॅडव्हॉन्स क्लेम) अंतर्गत ही सुविधा देण्यात येत आहे.

कार्यालयीन परिपत्रक जारी करीत ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे. एखादा गंभीर आजार झाल्यास कर्मचार्‍याला जर रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली, तर या सुविधेमार्फत त्याच्या खात्यामधून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते.

दुसर्‍याच दिवशी मिळतील पैसे :- मेडिकल अ‍ॅडव्हॉन्स क्लेम करणारा कर्मचारी सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सीजीएचएस पॅनलची मान्यता असलेल्या रुग्णालयात दाखल असावा. जर या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असेल, तर याबाबत ईपीएफओमार्फत तपासणी करण्यात येईल. या तपासणीनंतरच मेडिक्लेमसाठी अर्ज भरण्याची परवानगी मिळेल.

तुम्ही ज्या दिवशी अर्ज केला तो कामकाजाचा दिवस (वर्किंग डे) असेल, तर दुसर्‍याच दिवशी पैसे हस्तांतरित केले जातील. हे पैसे तुमच्या खात्यावर किंवा मग थेट रुग्णालयाकडे वळते करण्यात येतील. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करणे आवश्यक आहे. तुमचे एकूण बिल हे अ‍ॅडव्हॉन्स रकमेसोबत समायोजित केले जाते.

ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा मेडिकल अ‍ॅडव्हॉन्स क्लेम करू शकता. तसेच युनिफाईड पोर्टल मेम या संकेतस्थळावरूनही तुम्ही हा दावा करू शकता. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला यासाठीचा अर्ज (फॉर्म-31, 19, 10सी आणि 10डी) भरावे लागतील. यानंतर तुमच्या बँक खात्याच्या क’मांकाचे शेवटचे चार अंक एंटर करून व्हेरिफिकेशन करावे लागेल. यानंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर येणार्‍या पर्यायांमधून पीएफ अ‍ॅडव्हॉन्स (फॉर्म 31) हा पर्याय निवडा. पुढे तुम्हाला पैसे काढण्यासाठीचे कारणही नमूद करावे लागेल. यानंतर तुम्हाला हवी असणारी रक्कम एंटर करून, चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी लागेल. पुढे आपला पत्ता नमूद करा.

यानंतर गेट आधार ओटीपी हा पर्याय निवडा. हा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या भ’मणध्वनीवर येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल. अशा प्रकारे तुम्ही आपली कागदपत्रे जमा केल्याशिवायही पीएफ खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup