MHLive24 टीम, 27 जानेवारी 2022 :- गुरुवारी आयकर विभागाने दिलेल्या माहितीनूसार त्यांनी या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.79 कोटींहून अधिक करदात्यांना 1.62 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. यामध्ये 2020-21 या आर्थिक वर्षातील 1.41 कोटी परताव्याचा समावेश आहे, जे 27,111.40 कोटी रुपये आहे.(Income Tax Return)

प्राप्तिकर विभागाने ट्विट करून सांगितले की CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 24 जानेवारी 2022 पर्यंत 1.79 कोटी करदात्यांना 1,62,448 कोटी रुपयांचा परतावा जारी केला.

यामध्ये 1.77 कोटींहून अधिक संस्थांना जारी केलेल्या 57,754 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा आणि 2.23 लाख प्रकरणांमध्ये 1.04 लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा समाविष्ट आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup