Wheat Variety : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! गव्हाची ‘या’ जाती बागायती भागासाठी आहेत उत्तम, देणार 50 क्विंटल पर्यंत उत्पादन, डिटेल्स वाचा

Wheat Variety : देशात सध्या खरीप हंगाम (Kharif season) सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. सध्या संपूर्ण भारत वर्षात खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे.

अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (farmer) खतांची तसेच बी-बियाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो रब्बी हंगामात (rabi season) शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांची शेती (farming) करत असतात.

यामध्ये गहू हरभरा जवस मोहरी यांसारख्या पिकांचा समावेश असतो. रब्बी हंगामात आपल्या भारतात सर्वाधिक गव्हाची शेती (wheat cultivation) केली जाते. भारतात गव्हाची लागवड हरियाणा आणि पंजाब तसेच मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते.

याशिवाय गव्हाची लागवड महाराष्ट्रात देखील विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गव्हाची शेती पाहायला मिळते. मित्रांनो अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या काही विशेष जाती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या काही प्रमुख जाती.

महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती खालीलप्रमाणे

फुले समाधान (एनआयएडब्ल्यू 1994)  :- मित्रांनो गव्हाची ही एक सुधारित जात असून या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता या जातीचा गहू 2014 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे बागायती भागात वेळेवर तसेच उशिरा पेरणी साठी वापरला जाणार एकमेव वाण आहे. या जातीचा गहू पेरणी केल्यानंतर 115 दिवसात काढणीसाठी येत असल्याचा दावा केला गेला आहे.

या जातीच्या गव्हापासून हेक्‍टरी 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे जाणकार लोक नमूद करत आहेत. याशिवाय जातीचा गहू हा तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा आहे. निश्चितच गव्हासाठी तांबेरा रोग हा एक घातक रोग आहे. मात्र या जातीचा गहू तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असल्याने शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. या जातीपासून उत्पादित होणाऱ्या गव्हामध्ये तब्बल 12 टक्के प्रथिने आढळत असतात.

म्हणजे या जातीचा गहू हा आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याशिवाय या जातीच्या गव्हापासून उत्कृष्ट चपाती बनवल्या जातात. अशा परिस्थितीत या जातीच्या गव्हाला बाजारात मोठी मागणी असल्याचे शेतकरी नमूद करतात. एकंदरीत या जातीच्या गव्हाची शेती महाराष्ट्रातील गहू उत्पादक शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचे उत्पन्न कमवून देण्यास सक्षम आहे.

त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू :  301)  :- महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या सुधारित जातीपैकी एक जात म्हणून त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू :  301) या जातीला ओळखलं जातं. या जातीच्या गव्हाची लागवड महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे. गव्हाची ही जात हा बागायती भागात वेळेवर पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे जाणकार नमूद करतात.

या जातीच्या गहू पिकापासून उत्पादित होणारे गहू दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हात बारा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रथिने आढळते. यामुळे या जातीचा गहू देखील आरोग्यासाठी विशेष फायद्याचा आहे. शिवाय या जातीच्या गव्हापासून देखील उत्तम चपात्या बनवल्या जात असतात. यामुळे बाजारात या जातीच्या गव्हाला देखील मोठी मागणी असते.

शिवाय या जातीच गहू पीक तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याने चांगले उत्पादन मिळते. या जातीच्या गव्हापासून हेक्‍टरी 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन सहज रित्या मिळवल जाऊ शकते. निश्चितच या जातीच्या गव्हाची पेरणी देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष लाभप्रद सिद्ध होणार आहे.