Wheat Farming : बातमी कामाची ! उशिरा गहू पेरणी करायची का ? मग ‘या’ जातीच्या गव्हाची पेरणी करा लाखो कमवा

Wheat Farming : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात रब्बी हंगामाला (rabi season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो रब्बी हंगामात आपल्या महाराष्ट्रात गव्हाचे मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. महाराष्ट्रात जिरायती गहू लागवडीसाठी (Wheat Farming) 15 ऑक्‍टोबर ते 30 ऑक्टोबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे.

तसेच बागायती भागात वेळेवर गहू (Wheat Crop) लागवड करण्यासाठी एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असतो. तसेच बागायती भागात उशिरा पेरणी करण्यासाठी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. तसेच जाणकार लोकांच्या मते, उशिरा गव्हाची पेरणी 15 डिसेंबरपर्यंत करावी त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठी घट घडून येते.

अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी (Farmer) वाचक मित्रांसाठी उशिरा गहू पेरणी करताना कोणत्या वाणाची निवड करावी याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की,125 ते दीडशे किलो बियाणे उशिरा पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी वापरावं.

यामुळे शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन (Farmer Income) गहू पिकातून मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो आता वेळ न दवडता जाणून घेऊया बागायती भागात उशिरा गहू पेरणीसाठी कोणते वाण (Wheat Variety) शेतकरी बांधवांनी निवडले पाहिजे.

एच डी-२१८९ :- मित्रांनो बागायती भागात उशिरा पेरणी करण्यासाठी हा वाण सर्वोत्कृष्ट आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीला बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी देखील वापरले जाते. शिवाय या जातीच्या पिकातून 115 ते 120 दिवसांत 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळत असत.

कैलास पिबीएन 142 :– बागायती भागात उशिरा पेरणीसाठी गव्हाचा हे वाण देखील सर्वोत्कृष्ट आहे. जातीची पेरणी केल्यानंतर 115 ते 120 दिवसांत उत्पादन मिळत असते. या जातीपासून 30 ते 35 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचे जाणकार लोकांनी सांगितले आहे.

निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४)  :- गव्हाची ही जात बागायती भागात उशिरा पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीचा गहू कमी दिवसात काढणीसाठी तयार होतो.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचा गहू पेरणी केल्यानंतर 105 ते 110 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होत असतो. या जातीचा गहू चपातीसाठी उत्तम असतो शिवाय या जातीचे गहू पीक तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीच्या गव्हापासून 40 क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येते.

फुले समाधान- (एनआयएडब्लू-१९९४) :- या जातीचा गहू वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. या जातीचा गहू पीक १०५-११० दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा केला गेला आह. या जातीच्या गव्हापासून हेक्‍टरी ४५-५० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

शिवाय या जातीचा गहू तांबेरा रोगास तसेच मावा किडीस प्रतिकारक आहे. साहजिकच त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय या जातीचा गहू चपातीसाठी उत्तम आहे. लवकर तयार होणार वाण आहे.