Wheat Farming : बातमी कामाची! भारतात उत्पादीत केल्या जाणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता

Wheat Farming : देशात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामातील पिकांची (Kharif Crops) काढणी प्रगतीपथावर आहे. खरीप हंगामातील सोयाबीन (Soybean Crop) तसेच मका आणि कापूस पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे.

दरम्यान खरीप हंगामातील पिकांना परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका बसत आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधव खरीप हंगामात झालेली नुकसानभरपाई रब्बी हंगामात काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.

रब्बी हंगामात संपूर्ण देशात गहू (Wheat Crop) या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गहू लागवडीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुधारित जातींची पेरणी करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी सुधारित जातींची लागवड केल्यास गव्हाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या काही सुधारित जातींची (Wheat Variety) माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती.

भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या जाती खालीलप्रमाणे

शरबती गव्हाच्या प्रमुख जाती

C-306,

सुजाता (HI-617) JWS 17,

अमर (HW 2004),

अमृता (HI 1500),

हर्षिता (HI 1531),

hd 2987,

JW – 3173 इत्यादी लोकप्रिय आहेत.

डुरम गव्हाच्या जाती

 डुरम गहू पुसा अनमोल (HI – 8737),

 पुसा माळवी (HD – 4728),

 पुसा तेजस (HI 8759),

 मालवश्री (HI – 8381),

 मालव शक्ती (HI- 8498),

 मालव रत्न (HD-4672),

 MP0 – 1215, पुसा मंगल (HI-8713),

 पुसा पोषण (HI 8663),

 JW-1255, JW-1106 इत्यादी प्रमुख जाती लोकप्रिय आहेत.

गव्हाच्या सामान्य जाती

लोक-1,

GW – 322,

GW – 273,

GW – 366,

GW – 173,

एमपी – 1203

RVW – 4106,

GW – 451,

GW 3288,

JW – 3211,

GW – 3382,

JW – 1358 इ. प्रमुख जाती लोकप्रिय आहेत.