Tur Rate : अरे वा, तुरीच्या दरात मोठी वाढ ! तुर पोहोचली आठ हजाराच्या घरात, वाचा सविस्तर

Tur Rate : सोयाबीन कापूस या खरीप हंगामातील (kharif season) मुख्य पिकांसोबतच तूर लागवड (tur farming) देखील आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. तूर (tur crop) हे एक मुख्य खरीप पीक (kharif crop) म्हणून ओळखले जाते. या पिकाची शेती महाराष्ट्रात सर्वदूर पाहायला मिळते. सध्या बाजारात सोयाबीन आणि कापसाचा हंगाम सुरू झाला आहे.

या खरीप हंगामातील दोन्ही मुख्य पिकांच्या बाजार भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. तसेच कापसाला देखील अपेक्षेपेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. तुरीच्या बाजार भावात (tur market price)  मात्र चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. तुरीला हंगामाच्या सुरवातीपासूनच चांगला बाजारभाव (tur bajar bhav) मिळत आहे.

यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या तूर 6 हजार 600 ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत सर्वसाधारण भावात विकली जात आहे. निश्चितच सोयाबीन पिकांचे जरी शेतकरी बांधवांना निराश केलं असलं तरी देखील तुरीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणल आहे.

खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीन प्रमाणेच कापसाला देखील गेल्या वर्षी ऐतिहासिक बाजार भाव मिळाला होता यामुळे कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात देखील मोठी वाढ झाली आहे.

मात्र, चांगला समाधानकारक बाजार भाव मिळेल या आशेने सोयाबीन आणि कापसाची केलेली लागवड यावेळी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. कापसाला आणि सोयाबीन पिकाला अतिशय नगण्य बाजार भाव मिळत आहे. मात्र तुर पिकाला तूर पिकाला चांगला समाधान कारक बाजार भाव मिळाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे.

मित्रानो आज तुरीला सात हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. तुरीच्या दरात झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत आहे. खरं पाहता तुरीच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली असल्याने तुरीच्या उत्पादनात देखील घट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे सध्या तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे. मित्रांनो आज आपण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे तुर बाजार भाव.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/10/2022
अकोलालालक्विंटल272450078007395
यवतमाळलालक्विंटल94680076007200
चाकूरलालक्विंटल6660066006600
17/10/2022
भोकरक्विंटल3511170196065
मंगळवेढाक्विंटल11603065006500
मोर्शीक्विंटल109650075007000
हिंगोलीगज्जरक्विंटल10680072457022
बारामतीलालक्विंटल1400050005000
लातूरलालक्विंटल192520078007500
धर्माबादलालक्विंटल20620070756500
अकोलालालक्विंटल421630079057400
अमरावतीलालक्विंटल1902700076007300
यवतमाळलालक्विंटल189690075857242
चिखलीलालक्विंटल17580073506575
नागपूरलालक्विंटल58650074507213
वाशीमलालक्विंटल450665076007000
वाशीम – अनसींगलालक्विंटल30695074007250
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल48700073007150
मुर्तीजापूरलालक्विंटल150745076707550
खामगावलालक्विंटल544700077507375
मलकापूरलालक्विंटल231626278007350
वणीलालक्विंटल7640064006400
सावनेरलालक्विंटल2570057005700
रावेरलालक्विंटल5651065106510
चांदूर बझारलालक्विंटल83700075207350
मेहकरलालक्विंटल20670073007000
मंठालालक्विंटल1700070007000
पालमलालक्विंटल3655065506550
मंगरुळपीरलालक्विंटल152450073907200
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल88660073007200
सिंदी(सेलू)लालक्विंटल9675072307100
देवळालालक्विंटल1490049004900
काटोललोकलक्विंटल120600074516500
जालनापांढराक्विंटल8720072007200
माजलगावपांढराक्विंटल2700070007000
बीडपांढराक्विंटल2640164016401
कुर्डवाडी-मोडनिंबपांढराक्विंटल3570065016200
मंठापांढराक्विंटल1650065006500