Successful Farmer : भावा नाद खुळा…! विदेशातल्या कंपनीची नोकरी फेटाळली, ड्रॅगन फ्रुटची शेती सुरू केली, लाखो रुपयांची कमाई झाली, आता पंचक्रोशीत चर्चा रंगली

Successful Farmer : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण कृषिप्रधान देश असल्याचा तमगा मिरवत आहोत. आपल्या देशात जय जवान आणि जय किसानचा नारा बुलंद केला जातो. मात्र शेतकऱ्याचा (Farmer) जय हा केवळ घोषणेतच बघायला मिळतो. जमिनीची सत्य परिस्थिती खूपच विरोधाभासी पाहायला मिळते.

शेतकरी बांधव अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे आणि शेतीमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अक्षरशा मेटाकुटीला आला आहे. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून (Farming) दुरावत आहेत. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये (Agriculture) बदल केला तर निश्चितच लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करता येणे सहज शक्य आहे.

उत्तर प्रदेश मधील कौशांबी जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने देखील हे दाखवून दिले आहे. कौशांबी जिल्ह्यातील सिरथू तहसीलचे तरुण शेतकरी रवींद्र पांडे यांनी शेती हा एक फायदेशीर व्यवहार करून दाखवला आहे. निवडुंग प्रजातीच्या वनस्पती ड्रॅगन फळांच्या लागवडीमुळे (Dragon Fruit Farming) शेतकऱ्याचे जीवन बदलले आहे.

सध्या तरुण शेतकरी 62 हजार रुपयांची गुंतवणूक करून वर्षाला 4 लाख रुपये कमावत आहेत. गणित विषयातून पदवी घेतलेल्या रवींद्रने परदेशी कंपन्यांच्या ऑफर्स सोडून शेतीलाच आपले करिअर बनवून बेरोजगार तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. तेगई गावात राहणारे सुरेशचंद्र पांडे हे व्यवसायाने शेतकरी आहेत, त्यांना 3 मुले आहेत. मोठा मुलगा प्रवीण कुमार नौदलात शिपाई आहे.

परदेशी तज्ञांकडून शिकली पद्धत

वडील सुरेशचंद्र पांडे यांच्या मदतीने 62 हजार रुपये खर्चून ड्रॅगन फ्रूटची 400 रोपे लावल्याचे रवींद्र पांडे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील पहिल्या 2 वर्षात रासायनिक खतांच्या वापरामुळे झाडाला तुलनेने फळे आली नाहीत, ज्याबद्दल तो खूप निराश झाला. यावर उपाय शोधण्यासाठी रवींद्रने परदेशात ड्रॅगन फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी इंटरनेटवर संपर्क साधला.

त्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर थांबवून सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दिला. ते वापरल्यानंतर त्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळाले. सध्या खरेदीदार शेतात लावलेल्या फळांची वाट पाहत आहेत. याशिवाय ड्रॅगन फ्रूटची रोपे दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले शेतकरी घेऊन जातात, त्यातून देखील त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

ड्रॅगन फ्रुट मध्ये औषधी गुणधर्म आढळत असल्याने याला बाजारात मोठी मागणी असते. यामुळे ड्रॅगन फ्रुट शेती रवींद्र पांडे यांच्या साठी अधिक फायद्याचे ठरले आहे. शिवाय रवींद्र यांनी इतर शेतकर्‍यांसमोर एक आदर्श मांडला आहे. जे शेतकरी बांधव शेतीला तोट्याचा व्यवसाय म्हणून शेती पासून दुरावत आहेत त्यांच्यासाठी निश्चितच रवींद्र यांची ही यशोगाथा प्रेरणा देणारी आहे.