Okra Farming : भेंडी लागवड करताय ना! मग ‘या’ सुधारित जाती माहिती करून घ्या

Okra Farming : संपूर्ण भारत वर्षात भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. भेंडी (Okra Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात समवेतच संपूर्ण भारतात शेती केली जाते.

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात भेंडीची लागवड (Okra Cultivation) पाहायला मिळते. भेंडीचे पीक अल्प कालावधीत चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवून देत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) आता भेंडीची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत.

जाणकार लोकांच्या मते भेंडी लागवड निश्चितच शेतकऱ्यांना अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात अधिक उत्पन्न देण्यास सक्षम आहे, मात्र यासाठी शेतकरी बांधवांनी भेंडीच्या सुधारित जातींची शेती करणे अतिशय आवश्यक ठरणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी भेंडीच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊनच हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाऊ शकणाऱ्या भेंडीच्या काही प्रमुख जाती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

अंकुर 40- भेंडीची ही एक सुधारित जात असून महाराष्ट्रात या जातीची देखील लागवड केली जाते. या जातीचे भेंडीचे रोप हे सरळ वाढणारे असते. पेरामधील अंतर कमी ठेवले जाते. भेंडीच्या या सुधारित जातीची भेंडी हिरव्या रंगाची असते. विशेष म्हणजे ही जात चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीपासून हेक्‍टरी आठ ते दहा टन उत्पादन मिळत असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे. त्यामुळे निश्चितच या जातीच्या भेंडीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. 

महिको-10- ही भेंडीची एक लोकप्रिय जात असून या जातीची भेंडी अधिक उत्पादन देण्यास सक्षम असते. या जातीची फळे देखील महिको 10 या जातीच्या भेंडी प्रमाणेच गडद हिरव्या रंगाची असतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार भेंडीच्या यां सुधारित जातीपासून हेक्‍टरी 10 ते 12 टन उत्पादन सहजरीत्या मिळवले जाऊ शकते. निश्चितच उत्पादनाच्या बाबतीत ही भेंडीची जात महिको 10 या जातीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अशा परिस्थितीत या जातीची शेतीदेखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

वर्षा- ही देखील भेंडीची एक सुधारित जात आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात शेती बघायला मिळते. विशेष म्हणजे भेंडीची ही सुधारित जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीची भेंडी 5 ते 7 सेंटीमीटर लांबीची असते. भेंडीचा रंग हिरवा असतो व फळे लुसलुशीत असतात. या जातीची एक मोठी विशेषता आहे ती म्हणजे, फळे तोडल्यावर काळी पळत नाही. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार भेंडीच्या या सुधारित जातीपासून हेक्‍टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते. निश्चितच भेंडीची ही जात अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. यामुळे या जातीच्या भेंडीची लागवड देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष लाभप्रद सिद्ध होणार आहे.