Mustard Farming : नोकरीच काय घेऊन बसलात? रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या मोहरीची लागवड करा, 100 दिवसात लाखो कमवा, विशेषता वाचा
Mustard Farming : सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. आपल्या राज्यात खरीप हंगामातील मुख्य पिक सोयाबीन तसेच मका, तूर इत्यादी पिकांची हार्वेस्टिंग (Soybean Harvesting) सुरु आहे.
खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरु असताना राज्यातील अनेक भागात परतीचा पाऊस थैमान माजवत आहे. राज्यातील खरीप हंगामातील काढणीसाठी आलेल्या तसेच काढणी झालेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. सोयाबीन पिकाच्या काढणी झालेल्या सोयाबीन जंग्या किंवा पेंढ्या देखील जलमग्न होत आहेत.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत हंगामातील भरपाई करण्यासाठी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात तेलबिया लागवडीचा सल्ला दिला जात आहे. मोहरी (Mustard Crop) हे देखील एक प्रमुख तेलबिया पिक असून याची रब्बी हंगामात (Rabi Season) शेती केली जाते.
या पिकाची लागवड (Mustard Farming) शेतकऱ्यांसाठी (Farmer) विशेष फायद्याचे ठरते. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या मोहरीच्या सुधारित जातींची (Mustard Variety) लागवड करण्याचा सल्ला देतात.
अशा परिस्थितीत आज आपण एका मोहरीच्या सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण कमी दिवसात काढणीसाठी तयार होणाऱ्या मोहरीच्या सुधारित जातीची माहिती जाणून घेऊया. पुसा मोहरी 28 या जातीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पुसा मोहरी 28
पुसा मोहरी-28 ची वैशिष्ट्य काय आहे
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरीची ही जात 105-110 दिवसांत परिपक्व होते. ही जात अधिक उत्पादन घेण्यासाठी देखील ओळखली जात आहे. या जातीपासून सुमारे 1750 ते 1990 किलो उत्पादन मिळू शकते. निश्चितच मोहरीच्या या सुधारित जाती पासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.
मोहरीच्या या जातीची विशेषता म्हणजे या जातीच्या मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण 21.5 टक्के असते. अशा परिस्थितीत या जातीच्या मोहरी शेतीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. मित्रांनो ही जात कमी दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याने या जातीच्या मोहरी पासून अधिक तेल मिळत असल्याने या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे.