Kapus Bajar Bhav : ऐकलं व्हयं…! ‘या’ मुळे कापूस विकतांना घाई करू नका, कापूस विक्रीबाबत तज्ञांचं मत वाचा

Kapus Bajar Bhav : भारतात कापूस (Cotton Crop) हे खरीप हंगामात (Kharif Season) उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती (Cotton Farming) केली जाते. गेल्या वर्षी कापसाला उच्चांकी बाजारभाव (Cotton Rate) मिळाला असल्याने कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी वाढ देखील झाली आहे. कापसाला यावर्षीदेखील मागल्या वर्षाप्रमाणे बाजार भाव (Cotton Price) मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली आहे.

मात्र, यावर्षी जागतिक बाजारपेठेसह देशांतर्गत कापसाच्या बाजारभावात घसरण कायम आहे. गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी 14 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळाला होता. मात्र यावर्षी बाजारभावात कमालीची घट झाली आहे. सध्या कापसाला 8 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, कापूस खरेदी करणारे व्यापारी सध्या आवक होत असलेल्या कापतात ओलावा अधिक असल्याचे कारण पुढे करत बाजारभाव हाणून पाडत आहेत.

गमतीची गोष्ट अशी आहे की, हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच मुहूर्ताला यावर्षी कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव खानदेशात नमूद करण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये देखील यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळाला होता. मात्र तदनंतर कापसाच्या बाजार भावात सातत्याने घसरण झाली असून सध्या आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत चांगल्या प्रतीचा कापूस विक्री होत आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना कापूस विक्रीसाठी घाई करू नये असा मोलाचा सल्ला देखील दिला आहे. जाणकार लोकांच्या मते, कापसाच्या उत्पादनाबाबतच खरं चित्र आणि बाजार भाव यामधील स्पष्टता येण्यासाठी अजून अवकाश आहे. बाजार भावाबाबत खरी स्पष्टता जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता असते. यामुळे शेतकरी बांधवांनी दिवाळी सणासाठी गरजेपुरता कापूस विक्री करून दिवाळी सण साजरा करावा.

मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील जिनींग आणि सूत गिरण्या संघटनांकडून जानेवारी महिन्यात चालू हंगामातील आणि मागील हंगामातील कापसाची आवक लक्षात घेऊन कापसाच्या उत्पादनाबाबत अंदाज जाहीर केला जातो. यामुळे त्या वेळी कापसाच्या उत्पादनाबाबत एक अंदाज बांधता येतो. तसेच कापूस सल्लागार मंडळांमध्ये सदस्य असलेले निवाल यांच्या मते, कापसाची आवक वाढली तर कापसाचे बाजारभाव स्थिर राहतील मात्र जर कापसाची आवक कमी झाली तर कापसाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. दरम्यान काही जाणकार लोकांनी जागतिक बाजारपेठेतील चढ-उतारावर देशांतर्गत कापसाचे बाजार भाव ठरत असतात. म्हणजे कापसाच्या दरातील चढ-उतार जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असणार आहे.

तसेच काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशांतर्गत मोठ्या प्रमाणात सूतगिरण्या बंद आहेत. ज्या सूतगिरण्या सध्या सुरू आहेत त्यादेखील पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. यामुळे सूतगिरण्या मध्ये कापसाची मागणी कमी आहे. एकंदरीत काय या सूतगिरण्या जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होतील तेव्हा देशांतर्गत कापसाची मागणी वाढण्याची शक्यता दाट आहे.

दरम्यान 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्या देशात आयात होणाऱ्या कापसावर आकारला जाणारा शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत कापसाची किंमत कमी झाली आहे. अशा परिस्थितीत 31 ऑक्टोबर नंतर जेव्हा देशात कापूस आयात होईल तेव्हा त्या कापसावर आयात शुल्क आकारला जाणार आहे.

यामुळे त्यावेळी आयात होणारा कापूस हा महाग होणारच आणि यामुळे देशांतर्गत कापसाला देखील बाजार भाव चांगला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान जाणकार लोकांकडून कापसाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस निर्यातीवर साखरेप्रमाणे चे अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.

मित्रांनो खरे पाहता या वर्षी गेल्या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याने सरकारने या वर्षी उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. मात्र खरे पाहता त्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असली तरी देखील देशातील प्रमुख कापूस बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

आपल्या महाराष्ट्रातील खानदेश मध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस पाहायला मिळाला आहे यामुळे खानदेशात देखील कापसाच्या उत्पादनात थोडीशी घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचा दावा काही जाणकार लोकांनी केला आहे. एकंदरीत उत्पादनात घट निष्पन्न झाल्यानंतर बाजारभावात वाढ होणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना आता फक्त गरजेपुरता कापूस विकण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून देण्यात आला आहे.