Kapus Bajar Bhav : भारतात कापूस (Cotton Crop) या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Cotton Farming) केली जाते. भारतातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे कापूस या पिकावर अर्थकारण अवलंबून असते. आपल्या महाराष्ट्रात देखील कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते.
भारतातील कापूस लागवडीचा जर एकंदरीत विचार केला तर भारतात राजस्थान पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. मात्र आता या तिन्ही राज्यात पावसाच्या लहरीपणामुळे आणि हवामान बदलामुळे कापूस पिकावर आलेल्या रोगराईने कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे.
जाणकार लोकांच्या मते या वर्षी उत्तर भारतात कमी प्रमाणात कापूस उत्पादित होणार आहे. म्हणजेच कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तर साहजिकच बाजारपेठेत कापसाचा शॉर्टेज निर्माण होईल आणि देशांतर्गत कापसाला झळाळी मिळेल असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
यावर्षी मान्सून उशिरा सुरु झाला असल्याने कापसाच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. सुरुवातीला पाणी कमी असल्याने आणि नंतर अतिवृष्टी झाल्याने कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. एका आकडेवारीनुसार या तीन राज्यांमध्ये यंदा 51 लाख टन कापसाचे उत्पादन होणार आहे. खरं पाहता हंगामाच्या सुरुवातीला या तीन राज्यात एकूण 24 टक्क्यांनी उत्पादन वाढणार असल्याचे सांगितले जात होते.
मात्र आता पावसाच्या लहरीपणामुळे आणि हवामानबदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान या तीन राज्यात उत्पादनात घट झाली म्हणजे कापसाच्या बाजारभावात (Cotton Rate) वाढ होण्याची शक्यता व्यापारीवर्ग व्यक्त करत आहे. येथील व्यापाऱ्यांच्या मते, कापड बाजार पुर्वपदावर आल्यानंतर कापसाचे बाजार भाव सुधारण्याची शक्यता आहे. सध्या या तीन राज्यांमध्ये कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव (Cotton Price) मिळत आहे.
तसेच उर्वरित कापूस उत्पादक राज्याचा विचार केला तर सध्या इतर राज्यात कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव (Cotton Bajarbhav) मिळत आहे. उत्पादनात घट झाली आहे हे नक्की मात्र प्रत्यक्षात उत्पादनात घट किती झाली हे सांगण मोठ मुश्कील आहे. अशा परिस्थितीत आताच कापसाच्या बाजारभावाबाबत अंदाज बांधता येणे अशक्य असल्याचे जाणकार सांगत आहेत.
मात्र असे असले तरी उद्योगाकडून मागणी वाढल्यास कापसाचे बाजार भाव टिकून राहू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे. या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सरासरी 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव मिळू शकतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी बाजारपेठेतील आढावा घेऊन कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास त्यांना फायदा होणार आहे.