Kanda Bajarbhav : शेतकऱ्यांना सरकारचा गुलीगत धोका ! सरकारच्या ‘या’ निर्णयाने कांदा दर खाली येणार ? वाचा कसा राहणार कांद्याचा हंगाम

Kanda Bajarbhav : मित्रांनो महाराष्ट्रसमवेत कांदा (Onion Crop) हे संपूर्ण भारतात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची संपूर्ण भारतात शेती केली जाते. मात्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादन (Onion Production) विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र कांद्याच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो विशेषता पश्‍चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांद्याचे गोदाम म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

एकंदरीत काय राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण हे कांदा या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी, कांदा दराचा लहरीपणा कायमच शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो. यामुळे शेतकरी बांधव कांद्याला बेभरवशाचे पीक म्हणून संबोधतात. खानदेशात कांद्यावर कोंबडीचा देखील व्यवहार करणं चुकीचे असल्याची म्हण प्रचलित आहे.

कदाचित या वर्षी कांदा दराच्या (Onion Rate) लहरीपणाचा हा प्रत्यय जाणकार लोकांना देखील आला असेल. कांदा दराचा लहरीपणा गेल्या अनेक महिन्यापासून सुरु आहे. दरम्यान गेल्या हफ्त्यापासून कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. मात्र आता केंद्र शासनाने कांदा दर नियंत्रित ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्यांना कांद्यासाठी अधिक किंमत मोजावी लागू नये यासाठी केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने जवळपास 54 हजार टन कांदा हा राज्यांना पाठवला आहे. बफर स्टॉक मधला कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाला असल्याने कांद्याची आवक बाजारात वाढणार असून कांदा दर नियंत्रणात राहणार आहेत.

मात्र शेतकऱ्यांना त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात अजूनच घसरण होण्याची भीती वाटू लागली आहे. तसेच जाणकार लोकांनी देखील यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. एकंदरीत सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या हफ्त्याभरापासून वाढत असलेल्या कांद्याच्या बाजारभावाला खीळ बसणार आहे.

शेतकरी बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नवीन लाल कांद्याची बाजारात आवक होत नसल्याचे चित्र आहे. तसेच बराकीत किंवा कांदा चाळीत साठवलेला कांदा देखील आता सडत आहे आणि त्याचे वजन देखील लक्षणीय कमी झाले आहे.