Kanda Bajarbhav : धक्कादायक ! कांदा बाजारभावात पुन्हा घसरण ! ‘या’मुळे कांदा बाजारभावात मोठी घसरण ; वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे चित्र होते. मात्र आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसणार आहे.

सरकारच्या एका निर्णयामुळे सध्या कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आणि कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने बफर स्टॉक मधील जवळपास 54 हजार टन कांदा खुल्या बाजारात विक्री साठी पाठवला आहे. खरं पाहता देशात सध्या किरकोळ बाजारात कांदा 40 रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री होत आहे.

तसेच येत्या काही दिवसात किरकोळ बाजारात कांद्याला तब्बल पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळत असला तरी देखील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मित्रांनो, आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात घसरण नमूद करण्यात आली आहे.

कालपर्यंत साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा उच्चांकी बाजार भाव मिळत होता. मात्र आज कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण झाली असून आज कांद्याला 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो आज कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8500 क्विंटल कांदा आवक झाली.

याकरिता किमान भाव 500, कमाल भाव 2700 आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये इतका मिळाला आहे. दरम्यान राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार करता सर्वसाधारण बाजार भाव 1150 रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार 100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद करण्यात आला आहे.