Kanda Bajarbhav : दिन दिन दिवाळी कांदा दरात आली उसळी ! कांदा बाजारभाव चार हजाराच्या घरात, टिकून राहतील का कांदा बाजार भाव? काय म्हणताय तज्ञ…

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

खरे पाहाता, कांदा चाळीत साठवलेला कांदा आता संपत आल्याने तसेच कांदाचाळी साठवलेल्या कांदा (Onion Crop) हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात सडला असल्याने आणि नवीन कांदा बाजारात अजून मोठ्या प्रमाणात दाखल झाला नसल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

बाजारात आवक कमी होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) वाढ होत आहे. यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची (Onion Grower Farmer) दिवाळी गोड होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दावा केला आहे की, आगामी काही दिवस कांदा दरात झालेली वाढ कायम राहणार आहे.

यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मते, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून खूपच कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. शेतकरी बांधवांचा कांदा कमी दरात विक्री झाला आहे तर काही शेतकऱ्यांचा कांदा बराकीत सडला आहे. यामुळे कांदा दरात झालेली वाढ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक फायदा देणारी आहे. मात्र असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्यांना या दराचा फायदा होणार आहे.

दरम्यान काल झालेल्या लिलावात अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आले आहे. काल या बाजार समितीमध्ये 270 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच कालच्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान काल पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांदा आवक नमूद करण्यात आली. या एपीएमसीमध्ये काल 22 हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली.

तसेच या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात काल कांद्याला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किंमत बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. 

निश्चितच पिंपळगाव बसवंत एपीएमसीमध्ये कांद्याची आवक वाढून देखील कांदा दर स्थिर राहिले. यामुळे शेतकरी बांधवांना आगामी काळात कांदा दरात अशीच वाढ कायम राहणार असल्याची आशा आहे. जाणकार लोक देखील याच गोष्टीला दुजोरा देत आहेत.

त्यामुळे भविष्यात कांदा दरात अशीच वाढ कायम राहते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान आज 19 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या लिलावात महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रतिक्विंटल ते 2025 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/10/2022
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20100018001400
वाईलोकलक्विंटल25100020001500
लासलगावउन्हाळीक्विंटल1732470026312025
18/10/2022
कोल्हापूरक्विंटल312070022001400
औरंगाबादक्विंटल71430021001250
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल8651150024001950
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल3630025102000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल15051150027502200
सोलापूरलालक्विंटल1988710030001400
धुळेलालक्विंटल184615020001500
पंढरपूरलालक्विंटल95120025001200
साक्रीलालक्विंटल1750040021801600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल270150035002500
पुणेलोकलक्विंटल979080022001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल29100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल36750018001150
मलकापूरलोकलक्विंटल41050017751035
कामठीलोकलक्विंटल40100016001500
संगमनेरनं. १क्विंटल2189210026122356
कल्याणनं. १क्विंटल3160024002000
संगमनेरनं. २क्विंटल1313150020001750
संगमनेरनं. ३क्विंटल8755001000750
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल210180025002000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200015022011550
नाशिकउन्हाळीक्विंटल302435021501600
लासलगावउन्हाळीक्विंटल765080025501900
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल1308070024511950
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100020023011750
चाळीसगावउन्हाळीक्विंटल150020018901500
चांदवडउन्हाळीक्विंटल470070624901650
मनमाडउन्हाळीक्विंटल3500100020991850
कोपरगावउन्हाळीक्विंटल908050023451700
कोपरगावउन्हाळीक्विंटल354052523601840
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2200055031002250
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल472050020201630
देवळाउन्हाळीक्विंटल8430100021551900
नामपूरउन्हाळीक्विंटल1496010026952300