Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Kanda Bajarbhav : सरकारच्या त्या निर्णयामुळे पण नाही डगमगले कांद्याचे भाव ! राहता एपीएमसीमध्ये कांद्याला मिळाला 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव ; वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात (onion rate) सुधारणा पाहायला मिळत आहे. जवळपास एक आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. एक आठवडा पूर्वी मात्र कांद्याला अतिशय नगण्य बाजार भाव (onion market price) मिळत होता.

त्यावेळी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांदा पिकासाठी (onion crop) झालेला खर्च काढणे देखील अशक्य बनले होते. मात्र आता कांद्याला समाधानकारक भाव (onion price) मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (farmer) चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

दरम्यान केंद्र शासनाने आपल्याकडे असलेल्या बफर स्टॉकमधून जवळपास 54 हजार टन कांदा राज्यांना खुल्या बाजारात विक्री साठी पाठवला आहे. यामुळे कांद्याचे बाजार भाव नियंत्रित राहणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

मित्रांनो खरे पाहता किरकोळ बाजारात कांद्याला 40 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत असल्याने आणि भविष्यात 50 रुपये प्रति किलो पर्यंत किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी बफर स्टोकमधून कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवला आहे.

मात्र यामुळे घाऊक बाजारात देखील कांद्याच्या बाजारभावात घसरण होणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी सरकारच्या या निर्णयामुळे देखील अजूनही कांद्याच्या बाजारभावात घसरण झालेली नसल्याचे चित्र आहे.

मात्र जाणकार लोकांच्या मते सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे बाजारभाव जरी कमी झालेले नाही तरी देखील कांद्याचे बाजार भाव जे वाढणारे होते ते यामुळे वाढत नसल्याचे स्पष्ट आहे. म्हणजे साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

मात्र यामुळे सर्वसामान्यांना कांदा हा कमी किमतीत उपलब्ध होत आहे. मित्रांनो जसे की आपण ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेणार आहोत.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/10/2022
सातारा क्विंटल 237 1000 2000 1500
राहता क्विंटल 2244 500 2500 1950
भुसावळ लाल क्विंटल 5 1600 1600 1600
पुणे लोकल क्विंटल 9406 800 2200 1500
पुणे- खडकी लोकल क्विंटल 34 800 1600 1200
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 700 1600 1150
पुणे-मोशी लोकल क्विंटल 247 700 1800 1250
जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 13920 700 2600 2000
रामटेक उन्हाळी क्विंटल 20 2000 2400 2200