Kanda Bajarbhav : खुशखबर ! कांदा बाजारभावात सुधारणा ; अजून ‘इतका’ वाढणार बाजारभाव

Kanda Bajarbhav : महाराष्ट्रात कांदा लागवड (Onion Farming) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, तसेच कोकणात कांद्याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

म्हणजेच कांदा पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी घसरण होती. पण आता दिवाळी सणाला कांद्याची मागणी वाढत असल्याने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे कांद्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे कांद्याची आवक मोठी नगण्य आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) सुधारणा होत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल ते 2 हजार 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांदा विक्री होत आहे. मात्र वाढलेली महागाई लक्षात घेता, आणि हवामान बदलामुळे कांदा पिकाला (Onion Crop) अधिकचा खर्च करावा लागला आहे.

शिवाय आता बराकित साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला असल्याने वाढीव दराचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होत नाहीये. शेतकऱ्यांच्या मते, कांदा उत्पादीत करण्यासाठी प्रति क्विंटल 2200 रुपये पर्यंतचा खर्च आहे आणि सध्या कांद्याला यापेक्षाही कमी बाजार भाव (Onion Market Price) मिळत आहे. अशा परिस्थितीत कांद्याची शेती शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार सिद्ध होत आहे.

मात्र असे असले तरी सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे या हंगामातील कांदा उत्पादनात (Onion Production) घट होणार आहे. शिवाय अजून नवीन कांदा बाजारात येण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि निश्चितच बाजारात आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या मागणीत वाढ होणार आहे. भविष्यात बाजारात आवक कमी झाली तर मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होणार आहे आणि कांद्याच्या बाजारभावात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

असं झाल्यास निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र जर कांदा चाळीत 3 ट्रॅक्टर कांदा साठवलेला असेल तर आता कांदा केवळ दिड ट्रॅक्टर निघत आहे. यामुळे वाढीव दराचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो हा तर विश्लेषणाचा भाग राहील. मात्र असे असले तरी निदान कांदा पिकासाठी झालेला उत्पादन खर्च तरी शेतकऱ्यांच्या पदरी पडेल अशी आशा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.