Kanda Bajar Bhav : जून तेच सोन…! यंदा जुना कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल, जुन्या कांद्याला बाजारपेठेत उच्चांकी बाजार भाव, भविष्यात काय मिळणार दर

Kanda Bajar Bhav : भारतात कांदा (Onion Crop) हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखलं जातं. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती (Onion Farming) केली जाते.

मात्र यावर्षी दक्षिणेकडील राज्यात तसेच आपल्या महाराष्ट्रात अतिवृष्टीसारख्या पावसामुळे कांदा पिकाचे (Onion Crop) मोठे नुकसान झाले आहे. दरम्यानच्या ज्या शेतकरी बांधवांनी (Farmer) कांद्याची साठवणूक करून ठेवली होती त्या शेतकरी बांधवांच्या कांदाचाळीत देखील पाणी जात असल्याने कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे.

मात्र यामुळे जुन्या कांदा बाजार भावात (Onion Rate) वाढ होत असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. कांद्याला 1200 रुपये प्रतिक्विंटल ते 1600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत होता मात्र आता यामध्ये वाढ झाली असून 1500 रुपये प्रति क्विंटल ते 2600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव (Onion Market Price) जुन्या कांद्याचा मिळू लागला आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार पुढील दोन महिने जुना कांदा अजून तेजीत राहणार असून जुन्या कांद्याच्या बाजारभावात वाढ होणार आहे.

प्रमुख कांदा उत्पादक राज्यात परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील परतीचा पाऊस अक्षरशा थैमान माजवत आहे यामुळे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कांदा पीक आता खराब होत असल्याचे चित्र आहे. 7 ऑक्टोबर रोजी मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 817 टन कांद्याची आवक झाली होती. म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याची आवक तुलनेने कमी होती.

तर सोमवारी मात्र मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढली होती. सोमवारी या मार्केटमध्ये 1596 टन कांद्याची आवक झाली होती. मात्र आवक वाढल्यानंतर देखील सोमवारी जुन्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे. जाणकार लोकांच्या मते पुढील दोन महिन्यात नवीन कांदा बाजारपेठेत येणार नाही अशा परिस्थितीत जुना कांदा अजून दोन महिने तेजीत राहणार आहे.

निश्चितच ज्या शेतकरी बांधवांचा जुना कांदा कांदा चाळीत सहीसलामत राहिला आहे त्यांना या बाजार भावाचा फायदा मिळणार आहे. एकंदरीत कांद्याचा बाजार भाव वाढला तर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. मात्र असे असले तरी सर्वसामान्यांना कांदा रडवू शकतो असे व्यापारी नमूद करत आहेत.

दरम्यान व्यापारी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडे कांद्याच्या पिकात पावसामुळे रोगराई वाढली असून काही ठिकाणी कांदा जास्तीच्या पावसामुळे सडला आहे. वावरातला कांदा तर सोडाच कांदाचाळीत साठवलेला कांदा देखील जास्तीच्या पावसामुळे सडत असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटक मध्ये देखील जास्तीच्या पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे.

यामुळे परराज्यातून कांद्याची आवक नगण्य राहणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जुना कांदा भाव खाणार आहे. एकंदरीत पुढील दोन महिने जुन्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार असल्याचे व्यापारी नमूद करत आहेत.