Kanda Bajar Bhav : दिवाळीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या हातात ‘लक्ष्मी’ येणार…! कांद्याच्या दरात वाढ होणार, कारण की….

Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Onion Grower Farmer) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

देशातील कांद्यासाठी प्रमुख दहा कृषी उत्पन्न बाजार समितीपैकी सहा कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात आहेत. यावरून आपल्याला महाराष्ट्रात कांद्याचे किती मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते याची कल्पना येते. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या बाजारभावात (onion market price) सुधारणा झाली आहे.

नवीन कांदा अजून बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेला नसल्याने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होतं असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कांद्याच्या बाजारभावात (onion rate) क्विंटलमागे पाचशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आले आहे. नवीन कांदा साधारणता अजून दीड ते दोन महिन्यात बाजारात दाखल होणार आहे.

अशा परिस्थितीत कांद्याच्या (onion crop) बाजारभावात झालेल्या सुधारणा दीड ते दोन महिना कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात समवेतच प्रमुख कांदा उत्पादक राज्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच कांदाचाळीत साठवलेला कांदा देखील आता जास्तीच्या पावसामुळे खराब होत असल्याचे शेतकऱ्यांचे (farmer) म्हणणे आहे. पावसाच्या लहरीपणामुळे नवीन लाल कांद्याच्या (onion farming) उत्पादनात देखील घट होणार आहे.

अशा परिस्थितीत बाजारपेठेत कांद्याचा शॉर्टेज निर्माण होऊन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे श्रीलंका आणि मलेशिया मध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून भारतीय कांदा पाठवला जात किंवा निर्यात केला जात आहे. एकंदरीत, महाराष्ट्र समवेतच प्रमुख कांदा उत्पादक राज्यात जास्तीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले असल्याने कांदा उत्पादनात यंदा घटणार आहे. यामुळे या वर्षी कांद्याच्या बाजारभावात वाढ होणार आहे.

येत्या काही दिवसात दिवाळीच्या कालावधीमध्ये कांदा 2200 रुपये प्रतिक्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत या भाववाढीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. मात्र असे असले तरी सर्वसामान्यांसाठी कांदा रडवणारां ठरणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आणि कर्नाटक मध्ये परतीच्या पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरू असल्याने कांदा दरात वाढ अपेक्षित आहे.

जोपर्यंत नवीन कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजार भावात तेजी राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. निकिता त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

मात्र असे असले तरी कांदा पिकासाठी लागणाऱ्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने आणि पावसाच्या लहरीपणामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना या भाववाढीचा किती फायदा होतो ही एक विश्लेषणात्मक बाबा राहणार आहे.