Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Kanda Bajar Bhav : खुशखबर ! कांदा भाव खातोय, ‘या’ बाजारात कांद्याच्या बाजारभावात वाढ, दिवाळीनंतर कांदा दर अजून वाढणार?

Kanda Bajar Bhav : कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात तीनही हंगामात शेती (Farming) केली जाते.

महाराष्ट्रात खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात कांद्याची लागवड (Onion Farming) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दरम्यान कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. नवीन कांद्याची आवक अजूनही बाजारात अपेक्षित अशी पाहायला मिळत नाहीये. शिवाय हवामान बदलामुळे तसेच सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी कांदाचाळीत साठवलेला उन्हाळी हंगामातील कांदा देखील आता सडू लागला आहे.

अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधव (Onion Grower Farmer) आता कांदाचाळीत साठवलेला कांदा विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे बाजारपेठेत उन्हाळी कांद्याची आवक वाढत आहे. मात्र असे असले तरी कांद्याच्या बाजार भावात (Onion Price) वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2650 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. काल मंचर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला सोळाशे रुपये प्रतिक्विंटल ते 2650 पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळाला आहे.

खरं पाहता मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यातील एक महत्त्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती असून कांदा लिलावासाठी विशेष ओळखली जाते. या एपीएमसीमध्ये आंबेगाव तालुक्यात समवेतच शिरुर आणि खेड तालुक्यातील कांद्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात होत असते.

एकंदरीत ही एपीएमसी आंबेगाव तालुक्यासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या इतर तालुक्यांसाठी देखील एक महत्त्वाची बाजारपेठ बनली आहे. शिवाय आता मंचर एपीएमसीमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत असल्याने परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट झळकत आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या लिलावात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35000 कांदा गोणीची आवक झाली. गुरुवारी झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये एक नंबर कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटल ते 2650 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. दोन नंबर कांद्याला या एपीएमसीमध्ये गुरुवारी 1400 रुपये 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे.

तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल ते 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव गुरुवारी नमूद करण्यात आला आहे. तसेच कांद्याची खाद देखील या बाजारात दोनशे रुपये प्रतिक्विंटल ते सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. निश्चितच कांद्याच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट पाहायला मिळत आहेत.

दरम्यान काही व्यापाऱ्यांनी दिवाळीनंतर कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे नमूद केले आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत कांदा विक्री सुरूच ठेवणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.