Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Onion Grower Farmer) दिवाळीच्या तोंडावर एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र हा कांदा उत्पादनासाठी (Onion Production) संपूर्ण भारतात ओळखला जातो.
आपल्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. राज्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात कांद्याची शेती (Onion Farming) केली जाते. मात्र असे असले तरी कांदा हे पीक (Onion Crop) नेहमीच बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले गेले आहे. याची प्रचिती यंदादेखील आली.
यावर्षी कांदा दराबाबत (Onion Rate) बेभरवशाचे ठरले आहे. मात्र असे असले तरी आता दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात 1000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे. कांदाचाळी साठवलेला उन्हाळी कांदा आता भाव खात असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.
कांदा दरवाढीची नेमके कारणे तरी कोणती
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की राज्यात फक्त रब्बी हंगामात कांदा उत्पादित केला जातो असे नाही तर खरीप हंगामात देखील कांदा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खरीप हंगामातील लाल कांदा शेतकरी बांधव जुलैच्या महिन्यात लावत असतात. मात्र यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाली असल्याने पावसाच्या कमतरतेमुळे जुलै महिन्यात लावलेला लाल कांदा जळाला आहे.
तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये लावलेला कांदा देखील जास्तीच्या पावसामुळे खराब झाला आहे. आता या महिन्यात शेतकरी बांधवांनी कांदा लागवड पुन्हा एकदा केली आहे. अशा परिस्थितीत आत्ता लावलेला कांदा बाजारपेठेत दाखल होण्यासाठी भरपूर अवकाश आहे. पुढील वर्षी एप्रिलच्या आसपास आता लावलेला कांदा बाजारात येऊ शकतो. म्हणजेच आता बाजारात नवीन कांद्याची आवक नगण्य आहे. शिवाय आता कांदा चाळीत साठवलेला कांदा देखील थोडा शिल्लक राहिला आहे.
त्यामुळे बाजारात कांद्याची आवक खूपच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते पुढील दोन ते तीन महिने कांदा दरात सुधारणा राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार असून दिवाळी पश्चात देखील अच्छे दिन येणार आहेत. खरे पाहता या वर्षी जुलैच्या आसपास कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल ते 500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमी बाजारभाव मिळत होता.
शिवाय हवामानाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादनात देखील घट झाली होती. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला होता. मात्र आता कांद्याच्या बाजारभावात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. आगामी काही दिवस बाजारात आवक कमी राहिल्यास हाच बाजार भाव कायम राहणार आहे.