Gopinath Munde Shetkari Apghati Vima : शेती व्यवसाय (Farming) हा जोखिम पूर्ण व्यवसाय आहे. एकदा शेतकरी बांधवांना शेती (Agriculture) करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो.
शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना अनेकदा अपघाताला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी बांधवांची मोठी हानी होते. अनेक प्रसंगी विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचा मृत्यू होतं असतो.
अशा परिस्थितीत घरातील कर्ता पुरुष गमावल्याने शेतकरी कुटुंबावर मोठ संकट उभ राहते. अशा शेतकरी कुटुंबावर उपासमारीची देखील वेळ येऊ शकते. कर्ता पुरुष काळाआड गेल्यानंतर उदरनिर्वाह भागवणे मोठे मुश्कील बनते. परिस्थिती आता अपघात ग्रस्त शेतकरी बांधवांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत (Yojana) शासनाकडून मदत केली जाणार आहे.
नैसर्गिक अपघातात शेतकरी बांधवांचा मृत्यू झाल्यास अशा शेतकरी बांधवांच्या वारसाला लाखां पर्यंतची मदत दिली जाते. अशा परिस्थितीत आज आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Scheme) नेमकी काय आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
या विमा योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या योजनेचा विमा हा शासनाकडून भरला जातो यामुळे शेतकरी बांधवांना विमा काढण्यासाठी कोणतेच पैसे भरावे लागत नाहीत. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांचा अपघातात मृत्यू झाल्यास लाखांची मदत केली जाते.
याशिवाय या योजनेच्या माध्यमातून अपघातात एखाद्या शेतकरी बांधवांचे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक डोळा व एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची मदत केली जाते.
तसेच योजनेच्या माध्यमातून एखाद्या शेतकरी बांधवाचे अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत देण्याचे प्रावधान आहे. निश्चितच यामुळे अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे.
योजनेअंतर्गत दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेअंतर्गत दावा करण्यासाठी अपघात ग्रस्त शेतकरी बांधवांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना सातबारा उतारा किंवा 8 अ. उतारा द्यावा लागतो.
अपघातात मृत्यू झाल्यास सदर शेतकरी बांधवांचा मृत्यू दाखला
याव्यतिरिक्त अपघाताचा प्रथम माहिती अहवाल देखील दावा करताना सादर करावा लागतो.
विजेचा शॉक, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व इतर कोणताही अपघात झालेला असल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल देखील या योजनेअंतर्गत मदत मिळवण्यासाठी दावा करणे हेतू सादर करावा लागतो.
याशिवाय अपघात झाल्याच्या ठिकाणचा घटनास्थळ पंचनामा देखील द्यावा लागतो.
तसेच संबंधित शेतकरी बांधवांचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र.
तसेच वयाचा दाखला किंवा दाखला नसल्यास शपथपत्र द्यावे लागते.
संबंधित शेतकऱ्यांची शिधापत्रिका (राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेली) आवश्यक असते.
ही कागदपत्रे तसेच दावा करतांना इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन सदर शेतकरी बांधवाच्या वारसदाराला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो.