Farmer Success Story : कोण म्हणतं सेंद्रिय शेती तोट्याचा सौदा! सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हा अवलिया कमवतोय लाखों, वाचा ही यशोगाथा
Farmer Success Story : गेल्या काही वर्षात सेंद्रिय शेतीची (Organic Farming) मोहीम देशभरात गाजत आहे. शेतकरी (Farmer) आता कमी खर्चात सेंद्रिय खते तयार करून पिकांचे चांगले उत्पादन (Farmer Income) घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या (Successful Farmer) या यादीमध्ये राजस्थानमधील नागौर येथील प्रगतशील शेतकरी (Progressive Farmer) दलुराम खिलेरी यांचा समावेश आहे, जो आपल्या शेतात शेण, गोमूत्र, गवत आणि गांडुळ यांचे अनोखे खत वापरतात. या खताच्या वापरामुळे शेतात कीटकनाशकांचा वापर बंद झाला आहे. आता कीड-रोग येण्याची शक्यता कमी झाली आहे, तसेच पिकांमधून सुमारे 20 ते 30 टक्के अधिक उत्पादन मिळत आहे.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
आता आजूबाजूच्या गावांमधील लोक दलुराम खिलेरीला ओळखू लागले आहेत आणि त्यांचे नवीन शेतीचे तंत्र शिकण्यासाठी दूरदूरहून येतात. आता दलुराम सेंद्रिय शेतीसोबतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती घाट्याचा सौदा वाटत आहे त्यांच्यासाठी या अवलियाने एक आदर्श घालून दिला आहे.
5 वर्षे सेंद्रिय शेती
दलुराम खिलेरी हे देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपारिक शेती करायचे, पण 5 वर्षांपूर्वी त्यांना कृषी विभागाकडून गांडुळ खत बनवण्याची माहिती मिळाली. मग काय सेंद्रिय खत बनवून अनेक जिल्ह्यात विकले गेले. गांडूळखत तयार केल्यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळाले. शिवाय खताची विक्री करून उत्पन्नात 20 ते 30 पटीने वाढ केली. दलुराम सांगतात की या सेंद्रिय खतामध्ये 2 ते 3% नायट्रोजन, 3% फॉस्फरस आणि 2% पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.
सेंद्रिय खत तयार केले
कृषी विभागाकडून सेंद्रिय खताची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सिमेंट टाकीची व्यवस्था केली. यानंतर गोमूत्र, शेण आणि गवत सापळा लावून सिमेंटच्या टाकीतच गांडुळे टाकतात. आता सर्व काम गांडुळांवर केले जाते. हे अनुकूल प्राणी 60 ते 90 दिवसात सेंद्रिय खत तयार करतात. हे सेंद्रिय खत शेतात टाकल्यावर जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच जमिनीची रचनाही सुधारते. त्यामुळे जमिनीचे पीएच तापमानही योग्य राहते आणि तणांचा त्रास होत नाही.
युरिया हानिकारक आहे बर
आता पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, दलुराम सांगतात की युरिया वापरल्याने जमिनीची सुपीक क्षमता आणि उत्पादन कमी होते. त्यामुळे कीटक-रोग पिकावर येण्याची शक्यता वाढते, त्यामुळे कीटकनाशकांची खर्च देखील वाढतो. त्याच वेळी, गांडूळ कंपोस्टचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा वासही येत नाही.
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गांडुळांच्या साहाय्याने बनवलेल्या या कंपोस्टमध्ये सेंद्रिय पदार्थ असतात, त्यामुळे माश्या आणि डास फिरत नाहीत आणि वातावरणही स्वच्छ आणि रोगमुक्त राहते. आज दलुराम खिलेरी सारखे अनेक शेतकरी सेंद्रिय खते बनवून स्वयंपूर्ण होत आहेत आणि एकमेकांपासून प्रेरणा घेऊन अतिरिक्त उत्पन्नही मिळवत आहेत.