Farmer Success Story : शेती ही जोखीम पूर्ण आहे. शेतकऱ्यांना (Farmer) शेतीव्यवसायात (Farming) अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अतिशय नगण्य उत्पन्न (Farmer Income) मिळत असतं.
यामुळे आता शेतकरी बांधव शेती (Agriculture) नको रे बाबा कसा ओरड करत आहेत. मात्र असे असले तरी आपल्या देशात असे अनेक नवयुवक आहेत जे चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळू लागले आहेत.
विशेष म्हणजे या नवयुवक तरुणांना शेतीव्यवसायातून चांगली कमाई होत आहे. आज आपण अशाच एका अवलिया विषयी जाणून घेणार आहोत ज्याने अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून मायदेशी परतत शेती करण्याचा मोठा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. मित्रांनो आज आपण पंजाब मधील राजविंदर सिंग यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.
राजिंदर सिंग यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून पंजाब मध्ये परतत शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हता. मात्र असे असले तरी राजिंदर सिंग यांनी शेती करायचीच असं ठरवलं आणि नैसर्गिक पद्धतीने शेती (Organic Farmingकरून शेतीमधून लाखों रुपयांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. आज त्यांच्या 8 एकर जमिनीवर ऊस, बटाटा, हळद, मोहरी या पिकांची नैसर्गिक शेती केली जात आहे.
यासोबतच ऊस आणि हळदीवर प्रक्रिया करून ते गूळ, साखर आणि हळद पावडर बनवतात. या बायप्रॉडक्टच्या विक्रीतून देखील त्यांना चांगले उत्पन्न मिळते. पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत आज राजविंदरला प्रति एकर 2 लाख रुपये नफा मिळत असल्याचे राजविंदर सांगतात.
राजिंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक शेती करून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. याशिवाय त्यांनी आपल्या शेतात आंबा, पेरू, चिकू, डाळिंब या फळझाडांची देखील लागवड केली आहे. यापासून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.
अमेरिकेतून मायदेशी परतले
44 वर्षीय राजविंदर आज नैसर्गिक शेती करून भरपूर पैसे कमवत आहेत. याआधी त्यांनी अमेरिकेत 5 वर्षे खूप संघर्ष केला. कधी ट्रक ड्रायव्हर तर कधी हॉटेल व्यवसायातही हात आजमावून बघितला, पण धकाधकीच्या जीवनात त्याला आपल्या गावाची आठवण यायची. त्यानंतर तो 2012 मध्ये परतला आणि हॉटेलचा व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायात यश मिळाले नाही म्हणून त्यांनी आपल्या गावात नैसर्गिक शेती सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. राजविंदर सांगतात की, पूर्वी ते 8 एकर जमिनीवर रासायनिक शेती करायचे, पण 2017 मध्ये त्यांनी नैसर्गिक शेती करून ऊस पिकवला.
हळूहळू हिरवळीचे खत आणि शेणखत वापरून त्यांनी 5 एकर शेतजमिनीवर उसासह 3000 फळझाडे लावली. त्यांची उत्पादने साठवण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी मातीची भांडी बनवली आणि नैसर्गिक शेतीनंतर ऊस आणि हळदीच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया मशीन खरेदी केली.
उसापासून 8 लाख रुपये कमवले बर
राजविंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ते आपल्या शेतातील ऊस बाजारात विकत नाही. तर उसाचे बाय प्रॉडक्ट तयार करून विकतात. उसामध्ये हळद, बडीशेप, तुळस, ड्रायफ्रुट्स इत्यादी मिसळून मसाले गूळ आणि साखर बनवून ते अतिरिक्त कमाई करत आहेत. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या त्यांच्या उत्पादनांना बाजारात जास्त भाव मिळतो.
दरवर्षी सुमारे 10 टन गुळाचे उत्पादन घेतात. यातून त्यांना वर्षाकाठी 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळतं असल्याचा त्यांनी दावा केला आहे. उसाव्यतिरिक्त राजविंदर बटाटे, हळद, मोहरी, कांदे आणि इतर भाज्यांचीही लागवड करतात. बटाट्याची लागवड करण्यासाठी ते बेड आणि मल्चिंग पद्धतीचा अवलंब करतात, ज्यामुळे बटाटे जमिनीच्या आत वाढण्याऐवजी जमिनीच्या वर म्हणजेच बेडच्या आत वाढतात.
याच्या वर मल्चिंग केले जाते, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहून 30 टक्के पाण्याची बचत होते. अशाप्रकारे तण येण्याची शक्यता देखील नाहीशी होते. याचा अजून एक फायदा म्हणजे बटाटे उपटून काढण्यासाठी फारसे कष्टही लागत नाहीत. खतासाठी ते फक्त शेणखताचा सर्वाधिक वापर करत असतात. पूर्वी शेणखत इतर शेतकऱ्यांकडून विकत घ्यायचे, पण आज ते गायीचे संगोपन करत आहेत. यामुळे त्यांना शेणखत उपलब्ध होते शिवाय दुधापासून चांगले पैसे देखील मिळतं आहेत.
कृषी उत्पादनांची ऑनलाइन विक्री करतात बर
राजविंदर सिंग यांची शेती करण्याची पद्धत इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळी आहे. तसेच त्यांची मार्केटिंगची पद्धतही इतर शेतकऱ्यांपेक्षा खूपच भिन्न असल्याचे पाहायला मिळते. राजिंदर सिंग नैसर्गिक शेती करून चांगल्या दर्जाचा शेतमाल आणि इतर बायो प्रोडक्ट उत्पादित करतात. हे सेंद्रिय उत्पादने ते बाजारात विकण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात.
ऑनलाइन मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या मदतीने त्याच्या शेतातील झाडांची फळे थेट ग्राहकांना मिळतात. आज पंजाब व्यतिरिक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातूनही अनेक ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. राजविंदर सांगतात की, त्यांच्या आजींच्या काळात ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टी त्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.
पर्यावरणाचे भान ठेवून राजिंदर सिंग शेती करत आहेत. यामुळे पर्यावरणाचे संवर्धन आणि चांगली कमाई या दोन्ही गोष्टी राजिंदर सिंग यांनी साध्य केले आहेत. राजेंद्र सिंग शेती करताना प्लास्टिकचा वापर करत नाहीत.
एवढेच नाही तर त्यांचे स्थानिक ग्राहकही वस्तू खरेदी करण्यासाठी स्वत:च्या पिशव्या घेऊन येतात. अशा प्रकारे आज मोगा गावातील राजविंदर सिंग पर्यावरणपूरक शेती करून वर्षाला 12 लाख रुपये कमवत आहेत. निश्चितच राजेंद्र सिंग यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होणार आहे.