Farmer Success Story : देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी बांधव शेती पासून (Agriculture) दुरावत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे आता नवयुवक शेतकरी पुत्र देखील चांगले उच्च शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काही हजारांच्या नोकरीवर समाधान मानत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र जर काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर भाजीपाला पिकातून देखील करोडो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी.
फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील काही शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायात करोडो रुपयांची झेप घेतली आहे. मौजे चिंचोली नकीब येथील काही शेतकऱ्यांनी गटशेती सुरू करून मिरचीच्या लागवडीचा (Chili Farming) प्रयोग केला.
विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यांच्यासाठी फायद्याचा ठरला असून मिरची (Chili Crop) या तरकारी पिकातून अवघ्या तीन महिन्यात एक कोटी रुपयांची कमाई करण्याची किमया या शेतकऱ्यांनी साधली आहे. यामुळे सध्या मौजे चिंचोली नकीब येथील शेतकऱ्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब या गावात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून समृद्ध फार्मर या उपक्रमावर काम सुरू आहे. याच समृद्ध फार्मर उपक्रमातून चिंचोली नकीब या गावात गटशेतीचा उदय झाला आहे. विशेष म्हणजे पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे चिंचोली नकीब या गावातील शेतकऱ्यांना आता आर्थिक फायदा मिळतं आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून चिंचोली नकीब या गावात मका गट, सोयाबीन गट, कापूस गट आणि मिरची गट असे चार गट तयार करण्यात आले आहेत. या चार गटांपैकी मिरची गटात चाळीस शेतकरी बांधव सक्रिय असून त्यांनी आपल्या 25 एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. या चाळीस शेतकऱ्यांनी मे महिन्यात मिरचीची शेती सुरू केली.
शेतकऱ्यांच्या मते गटशेतीमुळे त्यांना मिरची पिकासाठी आवश्यक असलेला उत्पादन खर्च खूपच कमी लागला आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या या मिरचीतून त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून उत्पादन मिळत आहे. म्हणजेच या ऑगस्ट महिन्यापासून मिरचीच्या पिकातून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते आजतागायत या शेतकऱ्यांनी 3750 क्विंटल मिरचीचे उत्पादन मिळवले आहे.
विशेष म्हणजे गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली मिरची चांगल्या दर्जाची असल्याने बाजारपेठेत तिला चांगली मागणी राहिली आणि चांगला बाजारभाव मिळाला आहे. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला असून आतापर्यंत एक कोटी 12 लाख रुपयांचे उत्पन्न झाल आहे.
त्यातून खर्च वजा केला तर या गटाला तब्बल 80 लाखांची कमाई झाली आहे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा राहिला आहे. विशेष म्हणजे हा नफा त्यांना अल्पकालावधीत मिळाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे पहायला मिळत आहेत. निश्चितच गट शेतीच्या माध्यमातून चिंचोली नकीब येथील या शेतकऱ्यांनी साधलेली ही किमया इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.