Animal Care : थंडीचा मौसम येतोय…! थंडीमध्ये गाई-म्हशीना होतात ‘हे’ घातक आजार, अशा पद्धतीने मिळवा या आजारांवर नियंत्रण

Animal Care : मित्रांनो आता मान्सून (Monsoon) अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात संपूर्ण देशात थंडीला सुरुवात होणार आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजानुसार 19 ऑक्टोबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे.

मित्रांनो ऋतुमानात बदल झाला की अनेकदा शेतकरी (Farmer) आणि पशुपालकांना (Livestock Farmer) त्यांच्या जनावरांच्या आरोग्याची (Animal Health) चिंता असते. थंडीच्या काळात प्राण्यांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.

या हंगामात जनावरांना अनेक घातक आजार (Animal Disease) होतात. हे आजार इतके धोकादायक आहेत की त्यामुळे जनावरांचा (Cow Rearing) जीव जातो. अशा परिस्थितीत थंडीत जनावरांना कोणते आजार होतात तसेच थंडीत जनावरांना आजार होऊ नये

यासाठी काय केले पाहिजे आणि आजार झाल्यास जनावरांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे तसेच आजारावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले पाहिजे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

न्यूमोनिया

  • मित्रांनो जनावरांमध्ये माणसाप्रमाणेच न्यूमोनिया आजार आढळतो. हा रोग जनावरांना दूषित वातावरणात आणि बंद खोलीत ठेवल्याने आणि संसर्गामुळे पसरतो. अशा परिस्थितीत थंडीमध्ये जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

निमोनिया आजाराची लक्षणे

  • जनावरांना भूक न लागणे
  • पशूच्या शरीरावर काटे येणे.
  • जनावराच्या सर्दी झाल्यावर डोळ्यातून आणि नाकातून पाणी येणे.

निमोनिया आजारावर उपाय

  • औषधात ग्रोवेलची अमिनो शक्ती द्या. हे जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजांची कमतरता पूर्ण करते.
  • एक बादली घ्या आणि बादलीत उकळत पाणी घ्या. पाण्यावर कोरडे गवत ठेवा. आता जनावराच तोंड सॅक किंवा जाड चादरीने झाकून घ्या. नंतर बादलीत ठेवलेल्या कोरड्या गवतावर टर्पेन्टाइन तेल टाका. यातून निघणारी वाफ जनावरांना आराम देईल.

अतिसार

  • थंडीच्या काळात जनावरांना अनेकदा अतिसार होतात. पशुपालक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात थंडीमध्ये जनावरांना अतिसार होत असल्याची तक्रार करतात. हा आजार हवामानातील बदलामुळे होतो.

जनावरांना होणाऱ्या अतिसारावर उपाय

  • प्राण्याला ग्रोवेलचा ग्रोविले फोर्ट आणि निओएक्सविटा फोर्ट द्या. त्यामुळे जनावरांना आराम मिळेल.

त्वचा रोग

  • बदलत्या ऋतूत गाई-म्हशींमध्ये त्वचेचे आजार फार लवकर पसरतात. अनेक प्रकारचे जिवाणू आणि कृमीमुळे प्राण्यांमध्ये त्वचेचे आजार होतात. यामध्ये जनावरांच्या त्वचेत पू पडतो, त्वचा लाल होऊ लागते.

उपाय

  • प्राण्यांना अँटीबायोटिक शैम्पूने आंघोळ घाला.
  • याशिवाय ओलिनॉल आणि प्रेडनिसोलोन हे औषध वापरावे.

लाळ्या खुरकूत आजार 

  • उन्हाळा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस हा रोग खूप वेगाने पसरतो. या आजारामुळे जनावरांचा मृत्यू देखील होत असतो. हा आजार विषाणूंद्वारे पसरतो. हे विषाणू हवेत असतात आणि हवेतून जीभ, तोंड, आतडे, खुर, कासे, उघड्या जखमेतून प्राण्यांच्या रक्तात पोहोचतात.

उपाय

  • या आजारावर कोणताही निश्चित उपचार नाही.
  • यासाठी लाळ्या खुरकूत आजाराची लस वेळेवर घ्यावी.
  • पालाश आणि तुरटीच्या पाण्याने तोंड आणि खुराच्या जखमा धुवाव्यात आणि जनावरांना प्रतिजैविके द्यावीत.

सर्दी आणि रोगापासून प्राण्यांचे संरक्षण करण्याचे मार्ग

  • गोठ्याला ओलावा आणि ओलसरपणापासून दूर ठेवा.
  • सूर्यप्रकाश प्राण्यावर पडू द्या.
  • नेहमी संतुलित आहार द्या.
  • जनावरांना तलावापासून दूर ठेवा.
  • गोठ्याच्या जमिनीवर पेंढा वापरा.
  • गाई-म्हशींच्या वासराना दूध देऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढवा.
  • गाईंना गुरांना चांगला चारा खाऊ घाला.
  • शक्यतो जनावरांना कोमट आणि गोडे पाणी द्यावे.
  • पोटातील जंतांच औषध प्रौढ आणि लहान जनावरांना द्या.
  • बाह्य परजीवी टाळण्यासाठी, कोमट पाण्यात औषध मिसळून आंघोळ जनावरांची आंघोळ घाला.
  • जनावरांना उबदार ठेवण्यासाठी बोनफायरची म्हणजे शेकोटीची व्यवस्था करा.
  • लहान जनावरांना एमिनो पॉवर देणे आवश्यक आहे.
  • तापाची लक्षणे आढळल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.