Agriculture News : अरे वा, ये हुई ना बात ! आता भारतीय शेतीला अंतराळातून मिळणार मदत ; इस्रो करणार हे काम, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Agriculture News : भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर (Agriculture) आधारित आहे. मात्र भारतीय शेती आज देखील अनिश्चिततेने परिपूर्ण आहे. आपल्या देशातील शेतक-यांना (Farmer) कृषी शेती करताना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो.

शेतकरी बांधवांना हवामान बदलाचा (Climate Change) आणि शेती पिकांवर येणाऱ्या कीड-रोग यासारख्या सर्व आव्हानांना तोंड द्यावे लागते. यावर्षी देखील शेतकरी बांधवांना साच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात मोठ आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. यासारख्या समस्यांमुळे पिकांचे उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. जगातील सर्वात जुना व्यवसाय असूनही, आजपर्यंत शेतकरी हवामानाच्या अचूक अंदाजापासून वंचित आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) शेती आणि शेतकऱ्यांच्या अशा समस्यांवर आता एक उपाय शोधला आहे. होय, बरोबर ऐकलं तुम्ही, आता शेती करणे अधिक सोयीस्कर करण्यासाठी शेतकऱ्यांना थेट अंतराळातून मदत मिळणार आहे. आता इस्रो शेतकऱ्यांसाठी एक कल्याणकारी प्रकल्पावर काम करत आहे.

या प्रकल्पसाठी इस्रोने भारतीय शेतीसाठी दोन समर्पित उपग्रह स्थापन करण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयाला दिला आहे. या कार्यक्रमाला ‘भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रम’ असे नाव देण्यात आले आहे. यामुळे इस्त्रो ने सादर केलेल्या या प्रस्तावात नेमकं काय दडलं आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

इस्रोचा ‘भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रम’ आहे तरी नेमका काय 

शेतीच्या आधुनिक तंत्रामुळे हवामानाच्या अनिश्चिततेपासून बऱ्याच अंशी दिलासा मिळाला असला, तरी आजही भारताच्या ग्रामीण भागात हवामानावर आधारित शेती केली जाते. याठिकाणी हवामान चांगले राहिल्यास शेतकऱ्यांना चांगले पीक येण्याची आशा आहे, मात्र उकाड्यामुळे तसेच जास्तीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होतं आहे. हवामानाचा अचूक अंदाज न आल्याने ही समस्या उद्भवते. यावर्षी शेतीच्या नुकसानीला हवामान कारणीभूत असून, त्यामुळे देशातील काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अशाच समस्या पाहता आता इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी कृषी क्षेत्रासाठी दोन उपग्रह समर्पित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या उपग्रहांची मालकी देखील कृषी मंत्रालयाकडे राहील, जेणेकरून कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करता येतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी इंजिनियर्स कॉन्क्लेव्ह 2022 च्या निमित्ताने केंद्रीय कृषी मंत्रालयासोबत इंडिया अॅग्रीकल्चर सॅटेलाइट प्रोग्रामवर काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

अहवालानुसार, इंजिनिअर्स कॉन्क्लेव्ह 2022 कार्यक्रम इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, पिकाचे उत्पादन केवळ एका आठवड्यात साध्य होत नाही, तर या कामासाठी अनेक महिने लागतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानावर सतत लक्ष ठेवण्याची गरज असते. यासाठी आपले उपग्रह पुरेसे नाहीत, परंतु चांगल्या निरीक्षणासाठी आणि तांत्रिक सहाय्यासाठी अतिरिक्त उपग्रह स्थापित करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार बर 

अर्थात, सध्या ‘भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रम’ केवळ चर्चेत आहे, पण इस्रोचे हे प्रस्ताव शेतकऱ्यांची समृद्धी आणू शकतात. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. अशा स्थितीत उपग्रहावर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर हवामान अंदाज, पीक उत्पादन अंदाज, सिंचन, मातीची आकडेवारी आणि दुष्काळाशी संबंधित माहिती मिळू शकेल.

त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना आपत्तीपूर्वी व्यवस्थापन करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. उदाहरणार्थ, भात लावणीच्या वेळी दुष्काळ, पिकाच्या काढणीच्या वेळी पाऊस आणि उष्णता यामुळे पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट होत आहे. अशा परिस्थितीत, इस्रोच्या प्रस्तावित ‘भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रमा’अंतर्गत उपग्रहांद्वारे हवामानातील प्रत्येक हालचाली आणि बदलावर लक्ष ठेवले जाईल. अशा परिस्थितीत वेळेआधीच अलर्ट जारी करून शेतीत मदत व बचाव कार्य करणे सोपे होईल.