50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो भूतपूर्व ठाकरे सरकारने (Thackeray Government) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची (Farmer) दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती. त्यावेळी ठाकरे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचं अनुदान (Subsidy) स्वरूप प्रोत्साहन (Anudan) दिलं जाईल असं देखील सांगितलं होतं.
मात्र हा निर्णय जाहीर होऊन जे काही दिवस उलटले आणि कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. अखेर ठाकरे सरकार पडले मात्र ठाकरे सरकारच्या कार्यकाळात प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही.
आता नवोदित शिंदे सरकारने पूर्वीच्या ठाकरे सरकारचा 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय जशास तसा ठेवला असून आता राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देऊ करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सार्वजनिक झाली आहे. सदर यादी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान या पहिल्या यादीत आठ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 65 हजार 364 लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या अधिकृत पोर्टलव्दारे प्राप्त झालेल्या यादया संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय,संबंधित बॅंक शाखा, तहसीलदार कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे राहणार आहेत त्यांना आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. यासाठी सदर यादी मध्ये नमूद करण्यात आलेला विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी महत्वाची कागदपत्रे अनिवार्य राहणार आहेत. दरम्यान बँकांनी अपलोड केलेल्या माहितीप्रमाणे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या याद्या आगामी काही दिवसात सार्वजनिक होणार आहेत.
पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांना दिवाळीआधी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू असल्याने राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांची नावे दुसर्या आणि तिसर्या यादीत येणार आहेत.