50 Hajar Protsahan Anudan : ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात मिळणार 450 कोटी, ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसा

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाच्या (Subsidy) पहिल्या टप्प्यातील याद्या सार्वजनिक झाल्या आहेत. यामुळे अडीच वर्षांपासून शेतकऱ्यांची (Farmer) प्रतिक्षा अखेर संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो गेल्या महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये जेव्हा कर्जमाफीची घोषणा केली त्यावेळी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Yojana) नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय घेतला. आता या योजनेअंतर्गत वर्तमान शिंदे सरकार 50 हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान (Anudan) राज्यातील पात्र शेतकर्‍यांना देऊ करत आहे.

2017 18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षापैकी किमान दोन वर्ष पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत (Farmer Scheme) 50 हजारांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. आता या प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख 29 हजार 260 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांसाठी 450 कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हे अनुदान 20 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना खात्यामध्ये मिळणार आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका सुरू असल्याने यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट नाहीत. मात्र अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीत समाविष्ट केले जाणार असून अशा शेतकऱ्यांना नोव्हेंबर मध्ये अनुदानाचा लाभ देऊ केला जाणार आहे.

एकंदरीत काय गेल्या अडीच वर्षांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना आता 20 ऑक्टोबर पासून या अनुदानाची रक्कम प्रत्यक्षात हातात येणार आहे. या प्रोत्साहनपर अनुदानाचा निधी हा ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना बचत खात्यात अनुदानाचा पैसा मिळणार असल्याने बँक कर्जाची वसुली अनुदानाच्या रकमेतुन करण्यास असमर्थ राहणार आहेत. दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी एक लाख 75 हजार शेतकरी पात्र राहणार आहेत. यापैकी जवळपास एक लाख 29 हजार 260 शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

उर्वरित शेतकऱ्यांची नावे दुसर्‍या यादीत समाविष्ट केले जाण्याची शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे. या योजनेची दुसरी यादी 1 नोव्हेंबर नंतर केव्हाही जारी होऊ शकते असं सूत्रांच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक विशेष गोष्ट अशी आहे की राज्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 14 लाखांच्या घरात आहे.

आणि या 14 लाखांपैकी एकट्या कोल्हापुरात 175000 नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत. याची टक्केवारी जर पाहिले तर जवळपास 12 टक्के नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी बांधव एकट्या कोल्हापुरात आहेत. निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज परतफेड करून इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श रोवला आहे.