50 Hajar Protsahan Anudan : अरे वा ! ‘या’ जिल्ह्यातील 1 लाख 61 हजार शेतकरी ठरलेत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र, डिटेल्स वाचा
50 Hajar Protsahan Anudan : राज्यात सध्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या (Subsidy) खूपच चर्चा रंगल्या आहेत. शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधापासून ते मंत्र्याच्या एसी ऑफिसपर्यंत सर्वत्र महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Phule Farmer Loan Waiver Scheme) दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या (Anudan) चर्चा पाहायला मिळत आहेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Sarkar) सत्तेत आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Yojana) राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
त्यावेळी भूतपूर्व महा विकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हेतू प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिले जाईल असे जाहीर केले होते. मात्र तदनंतर कोरोना आला त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देता येणे शक्य झाले नाही.
शिवाय गेल्या काही महिन्यांपूर्वी यात सत्ताबदल झाला यामुळे प्रोत्साहनपर अनुदान लांबणीवर पडले. राज्यात सत्ताबदल झाले शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी सोयरीक करत राज्यात नवीन सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतर नवोदित शिंदे सरकारने भूतपूर्व सरकारचे अनेक निर्णय रद्दबातलं देखील केले.
मात्र शेतकरी हिताचा प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय कायम ठेवला. आता या निर्णयाची अंमलबजावणीची घटिका समीप आली आहे. दरम्यान या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील आता सार्वजनिक करण्यात आली आहे. मित्रांनो आता 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षात पैकी किमान दोन वर्षे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. दरम्यान या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना यादीत नाव आल्यानंतर आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 60 हजार 795 शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी 62 हजार 642 शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांची नावे नंतर जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान यादी मध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना यादीमध्ये दिलेल्या माहितीत काही तफावत आढळल्यास संबंधित बँकेत आक्षेप घेण्याचे आव्हान केले गेले आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांची माहिती यथायोग्य असेल त्या शेतकरी बांधवांना ताबडतोब आधार प्रमाणीकरण किंवा केवायसी करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.
सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या मते शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणीकरण केले तरच त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत पात्र शेतकरी बांधवांना यादीत नाव आल्यानंतर ताबडतोब सीएससी सेंटरवर जाऊन केवायसी करावी लागणार आहे.