Mhlive24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
मुलाखतीत कंगना आपल्यावर तथ्यहीन आरोप करून आपली बदनामी करत आहे, असे जावेद यांनी दाव्यात म्हटले आहे. जावेद यांनी अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
अभिनेता हृतिक रोशन याच्याविरोधात काहीही न बोलून मौन बाळगण्याच्या अख्तर यांच्या भूमिकेवर कंगना मागील काही काळापासून सातत्यानं निशाणा साधत होती. एका मुलाखतीत ती अख्तर यांच्याविषयी म्हणाली होती, ‘एकदा जावेद अख्तर यानी मला घरी बोलावलं होतं.
राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय हे सारे मोठे व्यक्ती आहेत असं ते म्हणाले होते. तू त्यांची मदत घेतली नाहीस तर तुझ्याकडे आणखी कोणताच पर्याय नसेल. ते तुला कारागृहात टाकतील. तुला आत्महत्या करावी लागेल’.
हे खुद्द जावेद अख्तर यांचेच शब्द असल्याचं तिनं स्पष्ट केलं. हृतिकची माफी मागण्यावाचून आपल्याकडे कोणताही पर्याय नसल्याचं सांगताना ते आपल्यावर प्रचंड ओरडले होते असा गौप्यस्फोटही तिनं केला होता.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर