Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

‘सोनियासेना आणखी किती तोंडं बंद करणार?’; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगना पुन्हा रणांगणात

Mhlive24 टीम, 4 नोव्हेंबर  2020 :- वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

Advertisement

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

अर्णब यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांसह अनेकजण उतरले आहेत. तसंच अर्णब यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना राणावत देखील उतरली आहे. तिने आघाडी सरकारवर निशाणा साधला.

Advertisement

यावेळी तिने पुन्हा एकदा शिवसेनेचा उल्लेख सोनियासेना केला, “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला.

Advertisement

एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असं कंगनानं म्हटलं आहे. तसेच अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल केला आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li