Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

सीबीआयचा रिया चक्रवर्तीला आणखी एक दणका; म्हणाले…

Mhlive24 टीम, 30 ऑक्टोबर 2020 :-सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याबद्दल सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आपले मत नोंदविले आहे.

Advertisement

सीबीआयने बुधवारी बॉम्बे हायकोर्टात सांगितले की, रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले ते काल्पनिक आहेत. अशा शक्यता एफआयआरचा आधार होऊ शकत नाही.

Advertisement

सुशांतची गर्लफ्रेन्ड रियाने आरोप लावला होता की, जून महिन्यात आत्महत्या करण्याआधी एक चुकीचं प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला. जेणेकरून सुशांत नाकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सब्सटेंसेस अॅक्टनुसार बॅन केलेली औषधे घेऊ शकेल.

Advertisement

सीबीआयने सांगितले की, सध्या एफआयआरमध्ये जे आरोप आहेत त्यातील जास्तीत जास्त काल्पनिक आहेत. सीबीआयकडून सांगण्यात आले की, ‘पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याआधी सुरूवातीला तपास करायला हवा.

Advertisement

एकाच गोष्टीसाठी दोन एफआयआर दाखल केल्या जाऊ शकत नाही. आम्ही सुशांतच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहोत. हे बघता मुंबई पोलिसांकडून अपेक्षा केली जात होती की, ते रियाची तक्रार आम्हाला फॉरवर्ड करतील. ते स्वत: एफआयआप दाखल करणार नाहीत’.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li