Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

आमीर खान च्या मुलीचा गौप्यस्फोट ; चौदा वर्षाची असताना झाला होता लैंगिक अत्याचार

Mhlive24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- बॉलीवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा हिने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

Advertisement

तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या.

Advertisement

परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. असे तिने म्हटले आहे. तिने हा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे.

Advertisement

हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. एक वेळ आली जेव्हा मी डिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली, असे इरा खानने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेकजण मला याबाबत विचारतात, पण मी त्याचे कारण सांगू शकत नाही.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वत: याचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात मला कधी पैशांची कमी भासली नाही. माझ्याकडे एक सपोर्ट सिस्टीम आहे.

Advertisement

माझे आई-वडील, मित्रमैत्रिणींनी कोणत्याही गोष्टीसाठी माझ्यावर दबाव आणला नाही. माझ्या आयुष्यात काहीही घडले तर ते मी माझ्या आई-वडिलांना सांगू शकते, असे इराने या व्हिडीओत म्हटले आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li