Business Success Story : मित्रांनो व्यवसायात (Business News) यशस्वी होण्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करावे लागतात. अहोरात्र काबाड कष्ट करण्याची जिद्द असेल तर व्यवसायात (Business Idea) निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्‍य होते. मित्रांनो आपल्या देशात लाखों व्यवसाय वर्षाकाठी सुरू होतात आणि लाखो बंद देखील पडतात. काही लोक व्यवसायात योग्य नियोजन करत असल्याने तसेच कष्ट करण्याची त्यांची जिद्द असल्याने ते व्यवसायात यशाची गिरीशिखरे सर करत असतात मात्र काही लोकांना ते शक्य होत नाही.

मित्रांनो आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा (Success Story) जाणून घेणार आहोत ज्यांनी एका दुकानापासून सुरू केलेला व्यवसाय आजच्या घडीला तब्बल 400 कोटींची उलाढाल करत आहे. मित्रांनो आज आपण फर्न अँड पेटल्स या कंपनीची यशोगाथा (Successful Person) जाणून घेणार आहोत. ही कंपनी एका दुकानापासून सुरू झाली आणि आज भारतातील सर्वात मोठे फुल आणि गिफ्ट रिटेलर म्हणून या कंपनीची ख्याती आहे.

तसेच जगातील सर्वात मोठी घाऊक फुल विक्रेता म्हणून या कंपनीला ओळखले जाते. मात्र हे एका दिवसात किंवा एका रात्रीत झालेल नाही. यासाठी तब्बल 27 वर्षांचा चढ-उताराचा प्रवास या कंपनीने पार केला आहे. Ferns N Petals चे 120 शहरांमध्ये (मे 2019 पर्यंत) 320 पेक्षा जास्त आउटलेट होते. मित्रांनो या कंपनीची सुरुवात विकास गुटगुटिया यांनी 1994 मध्ये केली होती. अशा परिस्थितीत आज आपण या व्यवसायाची केसस्टडी जाणून घेणार आहोत.

प्रवास कुठून सुरू झाला?

फर्न्स एन पेटल्सचा प्रवास दिल्लीतील फुलांच्या दुकानातून सुरू झाला. पण आज ते भारतभर 386 पेक्षा जास्त स्टोअर्ससह 120 शहरांमध्ये पसरले आहे, म्हणजेच आज Ferns N Petals हा एक मोठा भारतीय ब्रँड बनला आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी कोलकाता येथे शिकणारा विकास गुटगुटिया (Successful Businessmen) त्याच्या एका नातेवाईकाला फुलांच्या व्यवसायात मदत करत असे.

मात्र त्यादरम्यान त्यांना फुलांविषयी भरपूर ज्ञान मिळाले आणि येणाऱ्या काळात या ज्ञानामुळे त्यांना हे स्थान मिळण्यास मदत झाली. रस्त्याच्या कडेला बसून लोकं फुलं विकतात असं अनेकदा पाहायला मिळतं, पण नीट दुकान बांधण्याची कल्पना त्याकाळी नवीनच असावी आणि त्यामुळेच Ferns n Petals ची वेगळी ओळख निर्माण झाली.

1994 मध्ये पहिले स्टोअर उघडले

विकास गुटगुटिया यांनी 1994 मध्ये फर्न्स एन पेटल्स नावाने पहिले स्टोअर दिल्लीच्या एका भागात सुरू केले, कालांतराने या स्टोअरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग विकास गुटगुटियाने दिल्लीतच इतर अनेक भागात व्यवसाय वाढवला. मात्र या काळात या व्यवसायात दीर्घकाळ एक समस्या आली ती म्हणजे फुलांची देखभाल.

वेगवेगळ्या वातावरणातील लोकांपर्यंत ताजी फुले पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. फर्न्स एन पेटल्स हा आज एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे, ज्याचा अंदाज यावरूनही लावला जाऊ शकतो की त्याने त्याच्या 11 वर्टिकलमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर (UAE आणि सिंगापूर) ठसा उमटवला आहे.

400 कोटींचा व्यवसाय

बर्‍याच मीडिया रिपोर्ट्सनुसार, फर्न्स एन पेटल्सने 2021 मध्ये चांगल्या मार्केटिंग आणि सर्वोत्तम धोरणाच्या आधारे 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जुनी ब्रँड स्ट्रॅटेजी सोडून कंपनी सोशल मीडियावर नवीन स्ट्रॅटेजी अवलंबत आहे. कंपनीचा आज भारतातील फ्लॉवर व्यवसायाचा एक तृतीयांश वाटा आहे आणि ती दिल्ली-NCR मधील लग्नाच्या ठिकाणांची सर्वात मोठी साखळी आहे.

यासोबतच रशिया आणि ब्रिटन सारख्या आणखी अनेक देशांमध्ये व्यवसाय वाढवण्याची तयारी सुरू आहे. मूळतः फ्लॉवर किरकोळ विक्रेते असले तरी, फर्मने FNPacke सारख्या विविध ऑनलाइन उपक्रमांसह ई-कॉमर्स क्षेत्रातही विस्तार केला आहे. एफएनपी वेडिंग्ज अँड इव्हेंट्सच्या नावाखाली त्याने लग्न आणि कार्यक्रम नियोजन उद्योगात आपला व्यवसाय वाढवला आहे.