Business Success Story : कोणत्याही व्यवसायात (Business) किंवा बिजनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी वयाचं बंधन नसतं. कोणत्याही वयात माणूस व्यवसायात (Business Idea) यशाला गवसणी घालू शकतो. गुजरात मधील एका 85 वर्षीय नवयुवक तरुणाने देखील ही बाब अधोरेखित करून दाखवले आहे.

या अवलियाने वयाच्या 85 व्या वर्षी बिझनेस (Business News) सुरू केला असून या बिजनेस मधून त्यांना चांगली कमाई (Business Income) देखील होत आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर गुजरातचा हा बिझनेस मॅन (Successful Businessmen) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

म्हातारपणातही खूप उत्कटता

वय ही फक्त एक संख्या असते. हा आकडा बघून काय करायचं, कधी करायचं असा विचार करत लोक आता वय उलटून गेले आहे असं म्हणतात. हे सर्व विचार करणारे लोक नेहमी हातावर हात ठेवून बसलेले असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तरुणपणात उत्साह आहे आणि तुम्ही म्हातारे झाल्यावर हा जोश संपेल, तर तुमचा विचार खूप चुकीचा आहे.

ज्यांना काही करायचे असते ते वयाचा विचार करत नाहीत, तर मनापासून काम करण्याचा विचार करतात.  स्वप्ने सत्यात उतरायला कधीच उशीर होत नाही. पण स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करता घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आज आम्ही तुम्हाला गुजरातमधील एका वृद्ध व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत. ज्यानी 85व्या वर्षी बिजनेसमध्ये अप्रतिम काम केले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यात त्यांची ख्याती आता मोठी वाढली आहे.

आयुर्वेदिक उत्पादनांचा व्यवसाय (Successful Person) सुरू केला

एका वृत्तानुसार, राधाकृष्ण चौधरी असे या व्यक्तीचे नाव आहे. लोक त्यांना प्रेमाने आणि आदराने नानाजी म्हणतात. म्हातारपणात किंवा उतारवयात जिथे लोक हार मानून फक्त घरी बसतात. तिथे या अवलियाने वयाच्या 85 व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी आपला पहिला कारखाना सुरू केला आणि त्यांनी जगाला दाखवून दिले की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास कधीही उशीर होत नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे

त्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.  वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी पहिला कारखाना कसा सुरू केला याचे मथळ्यात वर्णन केले आहे. हा एका आयुर्वेदिक कंपनीचा कारखाना आहे. या व्हिडिओमध्ये राधाकृष्ण चौधरी त्यांच्या नवीन कारसोबत दिसत आहेत. त्याच्या पुढे पंडितजी या गाडीला टिळक लावत आहेत.

त्याच्या कंपनीचे नाव Avim Herbals असून ही पोस्ट त्या कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ही कंपनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या कमी कालावधीत त्यांच्या कंपनीने लोकांची मने जिंकली. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, यशस्वी होण्यासाठी काय केले ? त्यात दृष्टी आणि ध्येय होते. विश्वास, मेहनत आणि टीमवर्क होते.