Business Success Story : “अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है” हा डायलॉग तुम्ही चित्रपटात नक्कीच ऐकला असेल. मात्र असंच काहीस खऱ्या आयुष्यात देखील घडत असतं.

अरुण सॅम्युअल याच्या बाबत देखील असंच काही सल्ला आहे. मित्रांनो एकेकाळी अरुण घरोघरी जाऊन पन्नास रुपयात वॉटर प्युरिफायर विकायचे. वयाच्या सतराव्या वर्षी अरुण यांनी सेल्समॅन म्हणून कामाला सुरुवात केली होती. सतराव्या वर्षी त्यांनी घरोघरी जाऊन वॉटर प्युरिफायर विकण्याचे काम केले.

शाळेत असताना चुकीच्या वर्तनामुळे त्यांना शिक्षा देण्यात आली. चुकीच्या वर्तणामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले होते. यामुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र शिक्षण जरी पूर्ण केलेले नसले तरीदेखील अरुण (Successful Person) यांनी आजच्या घडीला 1424 कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. त्यामुळे अरुण यांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. आज आपण देखील अरुण (Successful Businessmen) यांचा जीवन प्रवास (Success Story) थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण आहे अरुण सॅम्युअल 

अरुण सॅम्युअल हे विंग्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. ही कंपनी देशातील टॉप ब्रँड्ससाठी एंड-टू-एंड मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रमोशन करते. अरुण सॅम्युअल यांनी 1994 मध्ये तीन लोकांसह ही कंपनी सुरू केली. आज त्यांची कंपनी भारतातील 67 टक्के आयटी कंपन्यांसाठी काम करते.

या कंपनीची भारतातील प्रत्येक राज्यात आणि इतर आठ देशांमध्ये कार्यालये आहेत. अरुणची कंपनी रोड शो, फेअर्स सारखे प्रमोशनल इव्हेंट्स आयोजित करते. ही कंपनी डिजिटल मीडिया मार्केटिंग, पायाभूत सुविधा, सुविधा व्यवस्थापन आणि सल्लामसलत यांचे काम पाहते. आय-कनेक्ट व्हर्टिकलद्वारे अरुण सॅम्युअल आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचा व्यवसाय, ऑपरेशन्स आणि गुंतवणूक भारतात स्थापित करण्यात मदत करतात.

सेल्समन ते बिझनेस टायकून बनण्यापर्यंतचा प्रवास

सेल्समन ते बिझनेस टायकून असा अरुणचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला आहे. पण अरुणने आपल्या जिद्दीने सर्व आव्हानांचा सामना केला. अरुण बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातुन येतात. त्यांचे वडील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अभियंता होते आणि आई हॉस्पिटलमध्ये आहारतज्ज्ञ होती.

बंगळुरूच्या सेंट जॉन हायस्कूलमधून त्याने दहावीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने क्राइस्ट युनिव्हर्सिटीमध्ये पीयूसी (प्री-युनिव्हर्सिटी कोर्स) साठी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये त्याची श्रीमंत घरातील मुलांशी मैत्री झाली. कॉलेजमधील दुष्टपणामुळे अरुण आणि त्याच्या ग्रुपला परीक्षेला बसण्यास नकार देण्यात आला. अरुणच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्याच्या मित्रांना परीक्षेला बसू दिले असले तरी अरुणला काढून टाकण्यात आले.

घरोघरी जाऊन वॉटर प्युरिफायरची विक्री केली 

1984 मध्ये एके दिवशी, अरुणने वर्तमानपत्रात एका प्रमोशन कंपनीत सेल्समनच्या नोकरीबद्दल वाचले. तो लगेच मुलाखतीसाठी पोहोचला आणि योगायोगाने त्याला ही नोकरीही मिळाली. तरूण वयात, जेव्हा त्याने अभ्यास करायला हवा होता, तेव्हा अरुणला लोकांच्या घरी जाऊन वॉटर प्युरिफायर विकावे लागले. कधी लोकांनी त्यांना अपमानित करून घरातून हुसकवले, तर कधी दारे वाजवताना हात थकले, पण त्यांची उत्पादने घ्यायला कोणीच तयार झाले नाही. या वाईट अनुभवांनीच त्याला आयुष्यात यशस्वी होण्याची प्रेरणा दिल्याचे अरुण सांगतात.

अशा प्रकारे उत्पादन विकण्याची कल्पना आली

एके दिवशी अरुणने पाहिले की युरेका फोर्ब्सचे सेल्समन त्यांचे वॉटर प्युरिफायर 800 रुपयांना विकतात. मग काय ज्या घरी युरेकाचे सेल्समन जायचे त्याच घरांमध्ये अरुण जाऊ लागला. आता त्यांचे वॉटर प्युरिफायर खूप स्वस्त असल्याने लोकांनी त्यांचे वॉटर प्युरिफायर विकत घेणे योग्य मानले. अशा प्रकारे अरुणने एका दिवसात 6 ते 8 वॉटर प्युरिफायर विकायला सुरुवात केली. याशिवाय त्याच कंपनीचे डिटर्जंट आणि इतर उत्पादने विकायला सुरुवात केली. लवकरच त्याला कंपनीत प्रमोशनही मिळाले.

या घटनेने आयुष्य बदलले

एके दिवशी दुपारी अरुण डिटर्जंट पावडर विकण्यासाठी घराचा दरवाजा वाजवत होता. तेवढ्यात एक माणूस घरातून बाहेर आला आणि त्याच्या डोक्यावर डिटर्जंटचे पाकीट मारत म्हणाला याने मन धुवा. या घटनेने अरुण चांगलाच भारावून गेला. काही वेळाने त्याने पुन्हा हिंमत एकवटली आणि दुसऱ्या घरात डिटर्जंट पावडर विकायला गेला.

तिथे त्याला एक स्त्री दिसली जिने त्याचे उत्पादन तर विकत घेतलेच पण त्याला बसवून ज्यूस पण प्यायला दिले. अरुणला वाटले की जगात सर्व प्रकारची माणसे आहेत, त्यामुळे त्याने हिंमत गमावू नये.  अरुणने काही काळ या कंपनीत काम केले आणि त्यानंतर 1985 मध्ये एका मित्रासोबत AERO Promotions नावाची कंपनी सुरू केली. त्याचा पहिला क्लायंट TGL होता.  याशिवाय त्यांनी टाटा टीचे प्रमोशनचे कामही पाहिले. पुढे हिंदुस्तान युनिलिव्हर, मॅरिको आणि IFB बॉश हे त्याचे ग्राहक बनले.

1994 मध्ये स्वतःची कंपनी सुरू केली

1993 मध्ये, अरुणला एक स्वप्न पडले ज्यामध्ये तो स्वत:ला एका उंच कड्यावर उभा असलेला दिसला आणि आवाज येतो ‘कुद – तू पडणार नाहीस, पण तू उडशील’. या स्वप्नाचे वर्णन करताना अरुण म्हणतात, मी पाहिले की एक गरुड न थांबता उडत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा स्वतःचा व्यवसाय (Business Idea) सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला विंग्स असे नाव दिले आणि कंपनीचा लोगो म्हणून गरुडाची निवड केली.

आपल्या भागीदार पासून विभक्त झाल्यानंतर अरुणने 1994 मध्ये विंग्स सुरू केले. 10 महिन्यांसाठी ऑफिस भाड्याने घेतले. त्यात 25 हजारांची गुंतवणूक केली. त्याचं काम चालू होतं. अरुणला सर्वप्रथम कूर्ग कॉफीच्या जाहिरातीचे काम मिळाले. यानंतर किसान, जिलेट, आशीर्वाद, इंटेल, हनीवेल, फ्लिपकार्ट, मॅक्स, कोका-कोला हे त्याचे ग्राहक बनले. तेव्हापासून अरुणने मार्केटिंग, जाहिरात आणि ब्रँडिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

व्यवसाय सुरु करण्यासाठी उधार पैसे घेतले होते

अरुणने 1988 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी आर्किटेक्ट सुझी मॅथ्यूशी लग्न केले. सुझीनेच त्याला AERO प्रमोशन सुरू करण्यासाठी 5,000 रुपये दिले. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल 1,224 कोटी रुपये आहे. अरुण सॅम्युअलची (Business News) कहाणी सांगते की एखाद्याने त्याच्या कामावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा जग त्यां व्यक्तीवर विश्वास टाकते. निश्चितच अरुण यांचा हा संघर्षमय प्रवास इतर तरुणांसाठी देखील प्रेरणा देणारा ठरणार आहे.