Business Idea :  प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत.

आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो सुरू करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. वास्तविक पारंपरिक शेती सोडून शेतकरी आता नगदी शेतीकडे वळत आहेत.

याचे कारण म्हणजे पारंपारिक शेतीत शेतकरी सातत्याने त्रस्त आहेत. याअंतर्गत गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये झाडे लावण्याची प्रक्रिया वाढली आहे.

शेतकरी सध्या साग, चंदन, महोगनी या झाडांची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. सदाहरित वृक्षांमध्ये महोगनीची गणना होते.

त्याची उंची 200 फुटांपर्यंत असू शकते. तुम्ही ते अशा ठिकाणी लावू शकता जिथे त्याची निगा राखण्याची योग्य सोय असेल.

त्याचा उपयोग काय आहे :- या झाडाच्या लाकडाची किंमत चांगली आहे. या झाडाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पाण्यातही खराब होत नाही.

टिकाऊ असल्याने जहाजे, दागिने, फर्निचर, प्लायवूड, सजावट आणि शिल्पे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत.

या गुणधर्मामुळे या झाडाजवळ डास व कीटक येत नाहीत.या झाडाच्या पानांचे व बियांचे तेल डासांना प्रतिबंधक व कीटकनाशक बनविण्यासाठी वापरतात.

किती कमावता येईल :-  या झाडाच्या लागवडीचा 12 वर्षात पूर्ण विकास होतो. पूर्ण विकसित झाल्यावर त्याची कापणी करता येते. या वनस्पतीमध्ये इतर झाडांपेक्षा जास्त गुणधर्म आहेत,

ज्यामुळे तज्ञ देखील त्याची लागवड करण्याची शिफारस करतात. अशा प्रकारे जर तुम्ही या झाडाची लागवड केली तर अवघ्या काही वर्षात तुम्ही करोडपती व्हाल.

जर तुम्ही योग्य रीतीने ही शेती हाताळली तर नक्कीच काही वर्षात या झाडाद्वारे तुम्हाला योग्य परतावा प्राप्त होऊ शकतो. आणी तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न देखिल पूर्ण होऊ शकते.