Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

युवकांनो शेती सोबतच कराल ‘असे’ काही तर तुम्ही व्हाल मालामाल; जाणून घ्या फायद्याचे अन महत्वपूर्ण आर्थिक गणित

0 15

MHLive24 टीम, 14 जुलै 2021 :- भारत हा कृषिप्रधान देश आहे, ७० टक्के जनता हि शेतीवर अवलंबुन आहे, हे वाक्य आता बोलुन बोलुन गुळगुळीत झाले आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत ५३% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबुन आहे.

वाढते औद्योगीकरण,शहरीकरण, माहीती तंत्रज्ञानातील क्रांती, सेवा विभागातील विकास या गोष्टी कृषी क्षेत्राचे स्थलांतर करण्यास कारणीभुत असतीलच पण हवानातील अनियमीतपणा, शेती बाजाराला योग्य भाव न मिळणे, अल्पभुधारकता अशा एक नाही अनेक प्रश्नांमुळे शेतीकडे पाठ फिरवली जाऊन लोक शहरीकरणाकडे वळत आहेत.

Advertisement

परंतु खरोखरच या देशातील शेती प्रगतीच्या वाटेवर चालली आहे का ? शेती कडे व्यवसाय म्हणून बघीतल्यास शेती फायदेशीर आहे का? या दृष्टीने विचार केल्यास ‘दिल्ली अभी बहुत दुर है’ असेच म्हणावे लागेल. म्हणुनच शेतीला आता एक फायदेशीर व भरवश्याचा जोडधंदा असणे गरजेचे आहे व यालाच शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असु शकतो.

शेतकरी हा कच्चा माल पिकवितो आणि तो कच्चा माल विकत घेऊन मग कारखानदार आणि उद्योजक त्यापासून पक्का माल तयार करतात. कच्चा माल स्वस्तात विकल्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात काही पडत नाही. परंतु त्यापासून पक्का माल तयार करणारा कारखानदार त्याच्यापासून किती तरी जास्त पैसे कमवत असतो. याची शेतकर्‍यांना कल्पना सुद्धा नसते.

Advertisement

वास्तविक पाहता शेतकरी आपल्या कच्च्या मालापासून बनवलेला पक्का माल स्वत:च महागात खरेदीही करत असतो. परंतु तो आपल्या कच्च्या मालाची किंमत आणि आपल्याच कच्च्या मालापासून तयार झालेल्या आणि आपण खरेदी करत असलेल्या पक्क्या मालाची किंमत याची कधी तुलनाच करीत नाही. त्यामुळे त्याला शेती मालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाचे महत्व लक्षात येत नाही.

शेतकर्‍यांनी आपल्या मनाला एक सवय लावून घ्यावी. आपण शेतात काय तयार करतो आणि त्या कच्च्या मालापासून कोणता पक्का माल तयार होतो याची यादी करावी. आपण कच्च्या मालाचे उत्पादक म्हणून किती लुटले जात असतो याची तेव्हाच त्याला कल्पना येईल. उदा. अनेक शेतकरी बाजारातून पाव किंवा ब्रेड आणून खातात.

Advertisement

एका सामान्य ब्रेडच्या लादीचे वजन २५० ग्रॅम असते आणि त्याची किंमत १५ ते १६ रुपये असते. आपण मात्र आपला गहू ८ किंवा ९ रुपये किलो अशा दराने विकून टाकलेला असतो. म्हणजे अडीचशे ग्रॅम वजनाच्या ब्रेडसाठी ङ्गार तर दोन ते तीन रुपयांचा गहू लागतो. परंतु त्या गव्हाचा मैदा तयार करून त्यापासून ब्रेड तयार करणारा मात्र १५ ते १६ रुपये कमावतो. याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे मूल्यवर्धन.

दोन रुपयाच्या गव्हावर प्रक्रिया केली की त्याचे झाले १५ रुपये. म्हणजे गव्हात तेरा रुपयांचे मूल्यवर्धन झाले. हे तेरा रुपये पूर्णपणे कारखानदाराच्या पदरात पडत नाहीत. त्यातला काही पैसा प्रक्रियेमध्ये, विक्रीच्या दलालीमध्ये, पॅकिंगमध्ये आणि वाहतुकीमध्ये खर्च होतो. परंतु तो दोन रुपयाच्या गव्हातून चार रुपये तरी नक्कीच कमावतो. अशारितीने आपण कधी हिशोबच करत नाही.

Advertisement

प्रक्रिया उद्योगासाठी वाव :- भारताची आजची स्थिती कृषी आधारित उद्योगांसाठी अनुकूल आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये एकच पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. भारतामध्ये राज्यनिहाय पीकविविधता असल्याने भारतात प्रक्रिया उद्योगासाठी कच्चा मालाची उपलब्धता सहज होऊ शकते त्यामुळे शेतकरी मोठ्या जिद्द आणि कष्टांनी अन्नधान्याचे उत्पादन घेतो.

काढणीपश्चात तंत्रज्ञानाअभावी दर वर्षी 25 टक्के शेतमालाची नासाडी होत असते म्हणुनच त्यास प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास ह्या प्रमाणात नक्किच घट होईल तसेच शेतक-यासाठी एक नवी बाजरपेठ उपलब्ध होईल.

Advertisement

आज खेडोपाडी पायाभुत सुविधांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही वीज, पाणी, रस्ते यांपासुन अनेक खेडी अजुन वंचीत आहेत त्यामुळेच तेथे औद्योगिक धंदे अजुन विकसीत झाले नाही. आणि म्हणुनच रोजगाराच्या संधी तेथे उपलब्ध नाहीत.

शेतमाल हि ग्रामिण भागात सहज उपलब्ध होणारी गोष्ट असुन अल्प सुविधांमध्ये आपण प्रक्रिया उद्योग सुरु करु शकतो. या मार्फत आपण आपल्याबरोबर इतरांना देखिल रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. सद्यस्थितीत प्रक्रिया उद्योग क्षेत्रात 30 टक्क्यांनी वाढ होत आहे.

Advertisement

सध्या भाजीपाल्याच्या निर्जलीकरणाचे विविध तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे.त्याचप्रमाणे फळांपासुन पल्प, रस,जॅम, स्क्वॅश बनविणे इ. तसेच वेफर्स, फरसाण बनविणे त्याचप्रमाणे लोणचे, मुरंबा बनविणे असे अनेक पर्याय शेतमाल प्रक्रियामध्ये उपलब्ध आहेत.

त्याचप्रमाणे सोयाबीन दुध, पावडर, सोया पनिर, तांदुळापासुन पोहे, पापड, दुधापासुन विवीध प्रक्रिया पदार्थ हि बनवता येऊ शकतात. भारतीय नागरिकांची जीवनशैली बदलत असून, “रेडी टू इट’ आणि “रेडी टू कुक’ उत्पादनांना ग्राहकांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement